
Jio Financial Services Share Price | मुकेश अंबानी यांची नवी कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने शेअर बाजारात तेजी सह सुरुवात केली आहे. प्री-ओपन ट्रेडिंगमध्ये जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर हा शेअर बीएसई निर्देशांकावर 265 रुपयांवर लिस्ट झाला. अल्पावधीतच या शेअरने 278 रुपयांचा टप्पा गाठला. तर एनएसईवर हा शेअर 262 रुपयांच्या भावावर लिस्ट झाला.
गेल्या महिन्यात कंपनीने विलिनीकरण प्रक्रियेअंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीजशी फारकत घेतली होती आणि कंपनीच्या शेअरची किंमत 261.85 रुपये निश्चित करण्यात आली होती. जिओ फायनान्शियलचे बाजार भांडवल 1,68,362.03 कोटी रुपये आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांची चांदी :
या लिस्टिंगचा सर्वात मोठा फायदा रिलायन्स इंडस्ट्रीजचे ते गुंतवणूकदार आहेत जे विक्रमी तारखेपर्यंत म्हणजेच 20 जुलैपर्यंत राहिले असते. वास्तविक, विलिनीकरण प्रक्रियेअंतर्गत अशा गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात समभाग देण्याचा प्रस्ताव होता. म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एका शेअरच्या बदल्यात जिओ फायनान्शियलचा एक शेअर मोफत देणार असल्याचे सांगण्यात आले होते.
हा अतिरिक्त शेअर गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यातही जमा करण्यात आला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांनी पैसे खर्च न करता जिओ फायनान्शियलचे शेअर्स मिळवले आहेत.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.