
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 223.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 220.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
आज बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी जिओ फायनान्शियल स्टॉक 1.29 टक्के वाढीसह 223.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरने सूचीबद्ध झाल्यापासुन आतपर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे.
जिओ फायनान्शियल कंपनी आपल्या पहिल्या बाँड इश्यूसाठी मर्चंट बँकर्ससोबत चर्चा करत आहे. जिओ फायनान्शियल कंपनी या बाँड इश्यूद्वारे 5000-10000 कोटी रुपये भांडवल उभारण्याची तयारी करत आहे जिओ फायनान्शियल कंपनी सध्या क्रेडिट रेटिंग मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमधून विलग झाल्यानंतर जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स 21 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते.
जिओ फायनान्शिअल ही कंपनी रिलायन्स कंपनीचा एक भाग आहे. या कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 265 रुपये आणि एनएसई इंडेक्सवर 262 रुपये किमतीवर सूचीबद्ध करण्यात आले होते. 21 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 278.20 रुपये विक्रमी उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.
23 ऑक्टोबर 2023 रोजी जिओ फायनान्शियल कंपनीच्या शेअरने 204.65 रुपये ही विक्रमी नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती. सप्टेंबर 2023 तिमाहीत या कंपनीने तिमाही आधारावर 101 टक्के वाढीसह 668 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.