
Jio Financial Share Price | मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीमधून विलग झालेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 21 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. आता मात्र या कंपनीचे शेअर्स आपल्या 261.85 रुपये या इश्यू किमतीपेक्षा कमजोर झाले आहेत.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने लिस्टिंगच्या दिवशी 278.20 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. त्यानंतर हा स्टॉक 23 ऑक्टोबर 2023 रोजी 204.65 रुपये या आपल्या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीवर आला होता. आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 0.38 टक्के वाढीसह 234.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 1.31 टक्क्यांच्या वाढीसह 236 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स फक्त 1.89 टक्के मजबूत झाले आहेत. तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरचा दीर्घकालीन चार्ट सकारात्मक संकेत देत आहे.
तज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये घसरणीच्या काळात गुंतवणूक केली पाहिजे. पुढील काही महिन्यांत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 265 रुपये किमतीवर सहज जाऊ शकतात, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,48,762.15 कोटी रुपये आहे.
20 जुलै 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा वित्तीय सेवा व्यवसाय ‘स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेड’ डिमर्ज करण्यात आला. यासाठी एनएसईवर एक प्री-ओपनिंग सेशनचा आयोजित करण्यात आला होता. या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरची किंमत 261.85 रुपये निश्चित करण्यात आली होती.
डिमर्जरनंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरधारकांना एका शेअरच्या बदल्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे एक शेअर्स देण्यात आले होते. दरम्यान ब्लॅकरॉक या कंपनीने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीसोबत 50-50 टक्के वाटा असलेली संयुक्त कंपनी स्थापन करण्याची घोषणा केली.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आणि ब्लॅकरॉक या दोन्ही कंपन्या नवीन कंपनीमध्ये प्रत्येकी 150 दशलक्ष डॉलर्सची प्रारंभिक गुंतवणूक करणार आहेत. ब्लॅकरॉक कंपनीच्या आशिया-पॅसिफिक प्रमुखांनी माहिती दिली की, जिओ आणि ब्लॅकरॉक या दोन्ही कंपन्यांच्या एकत्रित ताकदीचा आणि प्रमाणाचा फायदा भारतातील लाखो गुंतवणूकदारांना ग्राहकांना सेवा प्रदान करण्यासाठी केला जाईल.
ब्लॅकरॉक ही कंपनी जगातील सर्वात प्रतिष्ठित मालमत्ता व्यवस्थापन करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीसोबत भागीदार करणे म्हणजे, एक वेगळाच रोमांचक अनुभव आहे, अशी माहिती जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. या दोन्ही कंपन्यांच्या भागीदारीमुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांना खूप मोठा फायदा मिळू शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.