
Jio Financial Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होण्याची तारीख आली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 21 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने नुकताच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स वेगळे केले होते. आता या कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होणार आहेत. (Jio Share Price)
मागील आठवड्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स पात्र शेअरधारकांच्या डिमॅट खात्यात जमा झाले होते. रेकॉर्ड तारखेला ज्या गुंतवणूकदारांकडे RIL कंपनीचे शेअर्स असतील, त्या शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स वाटप करण्यात आले आहेत.
रेकॉर्ड तारखेला आयोजित केलेल्या विशेष प्री-ओपन कॉल लिलाव सेशनमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरची किंमत 261.85 रुपये निश्चित करण्यात आली होती. अशा प्रकारे, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरची किंमत ब्रोकरेज फर्मच्या 190 रुपये या अंदाजापेक्षा जास्त आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या NBFC कंपनीचे सूचीबद्ध होण्यापूर्वीचे बाजार भांडवल 1.66 लाख कोटी रुपये आहे. या बाजार भांडवलासह जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी भारतातील दुसरी सर्वात मोठी NBFC कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी आता निफ्टी-50, BSE सेन्सेक्स आणि इतर निर्देशांकांमध्ये देखील सामील केली जाणार आहे.
शेअर सूचीबद्ध होईपर्यंत शेअरची स्थिर राहणार आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कमोजीच्या प्रवर्तकांनी या कंपनीचे 45.80 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. आणि म्युच्युअल फंडांनी देखील कंपनीचे 6.27 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. यासह परकीय गुंतवणूक संस्थांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे 26.44 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने डिजिटल फर्स्ट एंटिटी म्हणून कर्ज देण्याच्या व्यवसायात आणि विविध वित्तीय सेवामध्ये चांगली कामगिरी केली आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना विमा, पेमेंट, डिजिटल ब्रोकिंग आणि मालमत्ता व्यवस्थापन या संबंधित सेवा प्रदान करण्याचे काम करते. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा 28 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मुकेश अंबानी आपल्या वित्तीय सेवा व्यवसायाचे रोडमॅप शेअर धारकांसामोरे सादर करणार आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.