 
						Double your Money | जेके पेपर या पेपर आणि पेपर वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने होरायझन पॅक आणि सिक्युरपॅक पॅकेजिंग कंपनीमध्ये सर्वात जास्त गुंतवणूक वाटा मिळवला आहे. JK Paper कंपनीने Horizon Packs आणि Securepacks Packaging या दोन्ही कंपनीमध्ये 85 टक्के मालकी वाटा खरेदी करण्यासाठी एक करार केला आहे. जेके पेपरने पुढील 3 वर्षात या दोन्ही कंपनीमध्ये उर्वरित 15 गुंतवणूक वाटा खरेदी करण्याची योजना आखली आहे. Horizon Packs आणि SecurePacks या दोन्ही कंपन्या कोरूगेटेड पॅकेजिंग उद्योगातील सर्वात मोठे उत्पादक म्हणून ओळखले जातात. या कंपन्यांचे संपूर्ण भारतात 7 उत्पादन केंद्र आहेत. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनीने 832 कोटी रुपये एकत्रित महसूल संकलित केला होता.
यावर्षी 103 टक्के परतावा :
जेके पेपर कंपनीच्या शेअर्सने एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना सुमारे 103 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/ BSE निर्देशांकावर जेके पेपर कंपनीचे शेअर्स 205.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 416.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही या वर्षाच्या सुरुवातीला जेके पेपर कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर आज तुमच्या पैशाचे मूल्य वाढून 2.03 लाख रुपये झाले असते.
तिमाही नफा :
जेके पेपर कंपनीने सप्टेंबर 2022 या तिमाहीत 250 कोटी रुपयांपेक्षा अधिक नफा संकलित केला आहे. जेके पेपर कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर 2022 तिमाहीत 251.71 कोटी रुपयांचा नफा संकलित केला आहे. मागील वर्षी याच कालावधीत या पेपर कंपनीने 118.13 कोटी रुपये नफा कमावला होता. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत जेके पेपर कंपनीने 1649.95 कोटी रुपये महसूल कमावला होता. त्याच वेळी सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत या कंपनीने 945.75 कोटी रुपये महसूल कमावला होता. जर आपण जून 2022 मधील तिमाहीचे आकडे पाहिले तर आपल्याला समजेल की कंपनीने 1437.12 कोटी रुपये महसूल कमावला होता. जेके पेपर कंपनीने तिमाही निकालात 204.84 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला असल्याचे जाहीर केले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		