
JTL Industries Share Price | सध्या अनेक कंपन्यांनी आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर करायला सुरुवात केली आहे. याचा परिणाम अनेक कंपन्याच्या शेअर्सवर पाहायला मिळत आहे. ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने गुंतवणुकदारांसाठी एक स्मॉल-कॅप श्रेणीतील स्टील कंपनीचा शेअर निवडला आहे. या कंपनीचे नाव आहे, जेटीएल इंडस्ट्रीज. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात मजबूत कामगिरी करू शकतात. शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के वाढीसह 205.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( जेटीएल इंडस्ट्रीज अंश )
ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांनी जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 35 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,511.25 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेटीएल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 204 रुपये किमतीवर ओपन झाले होते. ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन 275 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.
ब्रोकरेज फर्मने कंपनीच्या वार्षिक सेल्समधील वाढ पाहून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. याव्यतिरिक्त कंपनीने गॅल्वनाइजिंग पॉट्सची देखभाल बंद केल्याने कंपनीचे उत्पादन 20 टक्क्यांवरून वाढून 40 टक्क्यांवर जाण्याची अपेक्षा आहे. या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये 502 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर डिसेंबर तिमाहीत कंपनीने 567 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. याच कालावधीत कंपनीचा नफा 28 कोटी रुपयेवरून वाढून 30 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
2023 मध्ये जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचा ROE 22.13 टक्के आणि ROCE 30.80 टक्के नोंदवला गेला होता. जेटीएल इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः गॅल्वनाइज्ड ERW स्टील पाईप्स आणि ट्यूब्स, स्ट्रक्चरल स्टील आणि बांधकाम आणि अभियांत्रिकी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या बांधकाम साहित्याचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.