
JTL Industries Share Price | जेटीएल इंडस्ट्रीज या स्टील पाईप्स बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,400 टक्के परतावा कमावून दिला आहे. 28 ऑगस्ट 2020 रोजी जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 26.9 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 30 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 407.65 रुपये किमतीवर पोहोचले होते. (JTL Share Price)
मागील तीन वर्षात जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 1,413 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के वाढीसह 406.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कंपनीची आर्थिक कामगिरी
जून 2023 च्या तिमाहीत जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीने 25.4 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी जून तिमाहीत या कंपनीने 11 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीने 505.6 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 259.24 कोटी रुपये महसूल संकलित केले होता. मागील वर्षीच्या तुलनेत जून 2023 तिमाहीत कंपनीचा महसूल 35.5 कोटी रुपये वाढला आहे.
टार्गेट प्राईस आणि तज्ज्ञांचे मत
Tips 2 Trades फर्मच्या तज्ञाच्या मते जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स पुढील काळात 470 रुपयेपर्यंत वाढू शकतात. जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्समध्ये दैनंदिन चार्टवर 505 रुपये किमतीजवळ मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. तज्ञांनी अप ट्रेण्डमध्ये 429 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. तर डाऊन ट्रेण्डमध्ये लक्ष किंमत 382 रुपये निश्चित केली आहे. ऍक्सिस सिक्युरिटीज फर्मला अपेक्षा आहे की, जेटीएल कंपनीचे शेअर्स 2023 या वर्षात 470 रुपये लक्ष किंमत स्पर्श करू शकतात.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 398.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 416.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 185.70 रुपये होती. आणि जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3436.98 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.