
Stock in Focus | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंट्राडे ट्रेडमध्ये काबरा एक्स्ट्रुशन टेक्नीक कंपनीचे शेअर 17 टक्क्यांच्या जबरदस्त वाढीसह 482 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही अचानक आलेली तेजी एका बातमी नंतर दिसून आली होती. खरं तर काबरा एक्स्ट्रुशन टेक्नीक कंपनीच्या एका विभागाने स्वदेशी लिथियम-आयन बॅटरी विकसित करण्यासाठी बॅट्रिक्स नंतरची सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी Hero Electric सोबत व्यापारी भागीदारी केल्याचे जाहीर केले आहे. आणि ही बातमी बाहेर येताच स्टॉकमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती.
कंपनीने दिलेली माहिती :
काबरा एक्स्ट्रुशन टेक्नीक कंपनीने स्टॉक मार्केट नियामकला कळवले आहे की, सुधारित सेल केमिस्ट्री बॅटरी पॅकच्या विकासासाठी आणि निर्मितीसाठी कंपनीने Hero Electric सोबत व्यापारी भागीदारी केली असून ही एक अतिशय धोरणात्मक भागीदारी सिद्ध होईल आणि याचा कंपनीच्या उद्योग वाढीवर सकारात्मक परिणाम होईल. पुढील आर्थिक वर्षात कंपनीने 300,000 बॅटरी पॅक आणि चार्जर निर्मिती करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
S&P BSE सेन्सेक्स इंडेक्सममध्ये मागील एका महिन्यात 3 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती, या वाढीच्या तुलनेत काबरा एक्स्ट्रुजन कंपनीच्या शेअरची किंमत मागील एका महिन्यात 40 टक्क्यांनी वधारली आहे. यापूर्वी 20 जानेवारी 2022 रोजी काबरा एक्स्ट्रुजन कंपनीचा स्टॉक 566 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. Kabra Extrusion Technics ही कंपनी मागील 4 दशकांपासून प्लॅस्टिक एक्स्ट्रजन मशिनरीची निर्मिती करणारी भारतातील सर्वात मोठी उत्पादक म्हणून ओळखली जाते. उत्पादक आहे. काबरा एक्स्ट्रुजन कंपनी सुप्रसिद्ध कोलसाइट बिझनेस ग्रुपचा एक भाग आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.