1 May 2025 12:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE
x

Kahan Packaging IPO | खरं की काय? होय! पहिल्याच दिवशी 93 टक्के परतावा देऊ शकतो कहान पॅकेजिंग IPO शेअर, GMP पहा किती

Kahan Packaging IPO

Kahan Packaging IPO | सध्या तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक कडून मजबूत कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. आजपासून कहान पॅकेजिंग कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कहान पॅकेजिंग कंपनीचा IPO 6 सप्टेंबर 2023 ते 8 सप्टेंबर 2023 या काळात सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. SME विभागात या आठवड्यातील हा पहिला IPO असणार आहे. कहान पॅकेजिंग कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 80 रुपये निश्चित केली आहे.

कहान पॅकेजिंग GMP

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते कहान पॅकेजिंग कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये शानदार कामगिरी करत आहेत. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 75 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर या स्टॉकची ग्रे मार्केट किंमत टिकुन राहिली तर शेअर बाजारात शेअर 155 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 93.75 टक्के नफा मिळू शकतो.

IPO तपशील

कहान पॅकेजिंग कंपनी आपल्या IPO मध्ये 7.2 लाख शेअर्स खुल्या बाजारात जारी करून 5.76 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. मुंबईस्थित या कंपनीने आपल्या IPO मध्ये 7.2 लाख शेअर्समधून 40,000 इक्विटी शेअर्स राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि उर्वरित 6.8 लाख शेअर्स किरकोळ गुंतवणूकदार आणि उच्च निव्वळ मालमत्ता असलेल्या गुंतवणुकदारांसाठी प्रत्येकी 3.4 लाख शेअर्स या प्रमाणात राखीव ठेवले आहेत.

कहान पॅकेजिंग ही कंपनी मुख्यतः पॉलीप्रॉपिलीन आणि उच्च घनतेचे पॉलीथिलीन जसे की एचडीपीई आणि विणलेले कापड बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी मुख्यतः बी 2 बी सेवा व्यवसाय करते. कंपनी आपल्या ग्राहकांना कृषी कीटकनाशके, सिमेंट, रसायने, खते आणि अन्न उत्पादने सानुकूलित उद्योगांना पॅकेजिंग सेवा प्रदान करण्याचे काम करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kahan Packaging IPO for investment on 06 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Kahan Packaging IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या