 
						Kalpataru Power Share Price | एकीकडे नकारात्मक भावना आणि आर्थिक मंदीच्या संकेतामुळे सर्व शेअर बजार विक्रीच्या प्रेशरखाली ट्रेड करत आहेत, तर दुसरीकडे असे काही स्टॉक आहेत, ज्यांच्यावर जागतिक नकारात्मक भावना आणि शेअर बाजाराच्या अस्थिरतेचा कोणताही परिणाम पाहायला मिळत नाही आहे. असाच एक स्टॉक ज्याने नाव आहे, ‘कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन’. या सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स मागील एका महिन्यांपासून जबरदस्त तेजीत वाढत होते. आज मात्र स्टॉक मध्ये कमलीचा दबाव पाहायला मिळाला. गुरुवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.84 टक्के घसरणीसह 567.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. (Kalpataru Power Transmission Limited)
‘कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन’ कंपनीच्या शेअरने दीर्घ मुदतीत आणि कमी पैशाच्या गुंतवणुकीवर आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. आता तज्ञांना या स्टॉकमध्ये तेजीचे संकेत दिसत आहेत. ब्रोकरेज फर्म शेअरखानने ‘कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन’ कंपनीच्या स्टॉकसाठी 695 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ही लक्ष किंमत सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 21 टक्के जास्त आहे.
‘कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रिब्युशन’ ही कंपनी पायाभूत सुविधा विभागात अग्रणी कंपनी मानली जाते. कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये वार्षिक 46 टक्के वाढ झाली असून पुढील काळात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून कंपनीला मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. यामुळे कंपनीच्या व्यवसायात जबरदस्त वाढ होईल. तर दुसरीकडे नफ्याच्या बाबतीत ब्रोकरेज फर्म शेअरखानने विश्वास व्यक्त केला आहे की, उच्च ऑर्डरची पूर्ती तसेच कच्चा माल आणि मालवाहतूक खर्चात स्थिरता यामुळे कंपनीचे मार्जिन आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये वाढेल. याव्यतिरिक्त कल्पतरू आणि JMC प्रकल्पांच्या विलीनीकरणामुळे कल्पतरू कंपनीची विक्रीक्षमता अनेक पटींनी वाढली आहे.
‘कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन’ कंपनीने आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये 24 हजार कोटी रुपये महसूल संकलित करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ऑपरेटिंग कामगिरीमध्ये सुधारणा आणि नॉन कोअर मालमत्तेच्या विक्रीद्वारे कर्जात घट केल्याने कंपनीच्या खेळत्या भांडवलात सुधारणा होईल. या सर्व कारणांमुळे ब्रोकरेज फर्म शेअरखानने ‘कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर्स ‘बाय’ रेटिंग देऊन 695 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
कल्पतरू पॉवर ट्रान्समिशनचा मल्टीबॅगर परतावा :
‘कल्पतरू पॉवर’ कंपनीचे शेअर्स 13 मार्च 2003 रोजी फक्त 3.28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता स्टॉकमध्ये 17476 टक्क्यांची वाढ झाली असून शेअरची किंमत 567.05 रुपयांवर पोहोचली आहे. कल्पतरू पॉवर कंपनीने मागील 20 वर्षांत आपल्या शेअर धारकांना केवळ 57,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडो रुपयांचा परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी 11 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 332.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर अवघ्या 10 महिन्यांत स्टॉकची किंमत 80 टक्क्यांनी वाढून 13 मार्च 2023 रोजी 597.15 रुपयांवर पोहोचली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		