 
						Kalyan Jewellers Share Price | आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कल्याण ज्वेलर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कल्याण ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह 261 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कल्याण ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 261.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे.
कल्याण ज्वेलर्स कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीतील उत्कृष्ट निकालामुळे पाहायला मिळाली आहे. कल्याण ज्वेलर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 90 रुपये होती. शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी कल्याण ज्वेलर्स स्टॉक 10.13 टक्के वाढीसह 258.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
नुकताच कल्याण ज्वेलर्स कंपनीने आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कल्याण ज्वेलर्स कंपनीने सप्टेंबर 2023 तिमाहीमध्ये महसुलात 27 टक्के वाढ नोंदवली आहे. कल्याण ज्वेलर्स कंपनीने आपल्या निकालात माहिती दिली आहे की, कंपनीच्या भारतातील व्यावसायिक ऑपरेशन्समध्ये 32 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीच्या व्यवसायातील चांगली वाढ आणि महसुलात झालेली सुधारणा यामुळे कंपनीच्या आर्थिक कामगिरीत मजबूत वाढ पाहायला मिळत आहे.
कल्याण ज्वेलर्स कंपनीने नुकताच जाहीर केलेल्या अहवालात माहिती दिली आहे की, कंपनीने भारतातील नॉन-साऊथ मार्केटमध्ये 13 नवीन स्टोअर लाँच केले आहेत. कल्याण ज्वेलर्स या दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीने मागील 12 महिन्यांत नवीन स्टोअर लाँच केल्या कंपनीच्या कमाईमध्ये मजबूत वाढ नोंदवली गेली आहे.
त्याच वेळी, कंपनी चालू आर्थिक वर्षात 26 नवीन स्टोअर लाँच करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत कंपनीच्या नवीन शोरूमची एकूण संख्या 51 होईल. कल्याण ज्वेलर्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 24550 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		