
Kaya Share Price Today | भारतीय शेअर बाजारात स्मॉलकॅप्स स्टॉकचा बादशाह म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘पोरिंजू वेलियाथ’ यांनी ‘काया लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकवर बाजी लावली आहे. मार्च 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार ‘काया लिमिटेड’ कंपनीमध्ये ‘पोरिंजू वेलियाथ’ यांनी 0.63 टक्के भाग भांडवल होल्ड केले होते, आता ते वाढून 1.65 टक्के झाले आहे. शेअरहोल्डिंग डेटानुसार ‘पोरिंजू वेलियाथक’ यांनी ‘काया लिमिटेड’ कंपनीचे 215000 शेअर्स होल्ड केले आहेत. (Kaya Limited)
‘काया लिमिटेड’ ही कंपनी एक भारतीय बहुराष्ट्रीय स्किनकेअर, हेअर केअर आणि बॉडी केअर ट्रीटमेंट प्रदान करणारी कंपनी आहे. ‘काया लिमिटेड’ कंपनीचे भारतात 27 शहरांमध्ये क्लिनिक आणि 94 दवाखाने आहेत. मध्यपूर्वे आशियामध्ये 23 दवाखाने कार्यरत आहेत. बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.49 टक्के वाढीसह 316.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
पोरिंजू वेलियथची गुंतवणूक :
ट्रेंडलाइन डेटानुसार, ‘पोरिंजू वेलियाथ’ यांच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 16 कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. त्यांची एकूण संपत्ती 119.1 कोटी रुपये आहे. ओरिएंट बेल, टीसीएल, मॅक्स इंडिया, केरळ आयुर्वेद, या स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स त्यांनी खरेदी केले आहेत. मागील एका महिन्यात ‘काया लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 18.53 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात ‘काया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 17.26 टक्के कमजोर झाले आहेत.
कंपनीचे भाग भांडवल :
कंपनीच्या एकूण भाग भांडवलापैकी सार्वजनिक शेअरहोल्डिंग 59.9 टक्के, प्रवर्तकांचा वाटा 38 टक्के आहे. त्याच वेळी कंपनीमध्ये रिटेल शेअरहोल्डिंगचा वाटा 38 टक्के आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी काया कंपनीमध्ये 1.3 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर परकीय गुंतवणूकदार काया कंपनीचे 0.7 टक्के शेअर्स होल्ड करत आहेत. ‘काया लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 424.20 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 241 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.