 
						Kesar India Share Price | केशर इंडिया कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2847 टक्के परतावा कमावून दिला आहे. नागपूरस्थित केशर इंडिया ही कंपनी रिअल इस्टेट डेव्हलपमेंटचा व्यवसाय करते. या कंपनीचे शेअर्स 12 जुलै 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. ( केशर इंडिया कंपनी अंश )
लिस्टिंगच्या दिवशी या कंपनीचे शेअर्स 174 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरची किंमत 2847 टक्क्यांनी वाढली आहे. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी केशर इंडिया कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 3,713.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
8 मार्च 2023 रोजी केशर इंडिया कंपनीचे शेअर्स 126 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 7 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3713.15 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2846.9 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 50,000 रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 14.74 लाख रुपयेपेक्षा जास्त झाले असते.
नुकताच केसर इंडिया कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस जारी करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 1 शेअरवर 6 बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी 19 मार्च 2024 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून घोषित केला आहे. एप्रिल-सप्टेंबर 2023 या सहामाहित केशर इंडिया कंपनीने 21.46 कोटी रुपये कमाई केली होती. त्यात कंपनीने 6.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		