 
						Stock To Buy | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशसमध्ये केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. परकीय ब्रोकरेज फर्म जेफरीजने केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या स्टॉकला ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 500 रुपये लक्ष किंमत देखील जाहीर केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 14.31 टक्के वाढीसह 439.90 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.
शुक्रवारी केफिन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरची क्लोसिंग किंमत 384.80 रुपये होती. केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7283.07 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.22 टक्के वाढीसह 433.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
केफिन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. 29 डिसेंबर 2022 रोजी केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड स्टॉक 369 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. IPO किंमत बँडपेक्षा शेअरची लिस्टिंग किंमत 0.82 टक्के अधिक होती. तर एनएसई इंडेक्सवर हा शेअर 367 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता.
केफिन कंपनीचा आयपीओ 19 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2022 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. IPO मध्ये शेअरची किंमत बँड 347-366 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. केफिन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने मागील तीन महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 28 टक्के परतावा कमावून दिला आहे.
25 ऑगस्ट 2023 रोजी केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने 439.90 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 29 मार्च 2023 रोजी केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 271.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 55.8 अंकावर आहे, ज्यां वरून असे कळते की, हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाहीये.
केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी मुख्यतः कॉर्पोरेट्स हाऊसना म्युच्युअल फंड आणि IPO इश्यू सोल्यूशन्स सेवा प्रदान करणारी एक दिग्गज कंपनी मानली जाते. जेफरीज फर्मला केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या प्रॉफिट आणि कॅश फ्लो प्रवाहात अधिक होण्याची अपेक्षा आहे. जेफरीजच्या मते केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स आर्थिक वर्ष 2024 च्या PE अंदाजाच्या 29 पट अधिक दराने ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		