
Kintech Renewables Share Price | किनटेक रिन्यूएबल्स कंपनीच्या शेअरने मागील 7 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. किनटेक रिन्यूएबल्स या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,970 कोटी रुपये आहे. किनटेक रिन्यूएबल्स ही स्मॉलकॅप कंपनी आहे नागरी बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करते.
मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी किनटेक रिन्यूएबल्स कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 4916.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी किनटेक रिन्यूएबल्स कंपनीचे शेअर्स 2.00 टक्के वाढीसह 5,014.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
7 वर्षांपूर्वी म्हणजेच 6 ऑक्टोबर 2016 रोजी किनटेक रिन्यूएबल्स कंपनीचे शेअर्स 28.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 17,000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
जर तुम्ही 7 वर्षांपूर्वी किनटेक रिन्यूएबल्स कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 17,000 टक्क्यांनी वाढून 1.7 कोटी रुपये झाले असते. जर तुम्ही 7 वर्षांपूर्वी किनटेक रिन्यूएबल्स कंपनीच्या शेअरमध्ये 60,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी रुपये झाले असते.
मागील एका महिन्यात किनटेक रिन्यूएबल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 54.58 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,228.50 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 839.98 टक्के वाढवले आहेत. जून 2023 तिमाहीत किनटेक रिन्यूएबल्स कंपनीने एकूण 1.28 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जो मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत किनटेक रिन्यूएबल्स कंपनीने 22 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता.
मागील वर्षीच्या तुलनेत जून तिमाहीत कंपनीने 481.82 टक्के अधिक निव्वळ नफा कमावला आहे. जून तिमाहीत किनटेक रिन्यूएबल्स कंपनीने 150.87 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील वर्षी कंपनीने 32 लाख रुपये महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.