 
						Knowledge Marine Share Price Today | ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ या शिपिंग उद्योगात गुंतलेल्या स्मॉल कॅप कंपनीने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना घसघशीत नफा कमावून दिला आहे. ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ कंपनीचे शेअर्स मागील 2 वर्षांत 37 रुपयांवरून वाढून 1,000 रुपयेवर पोहचले आहे.
मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर धारकांनी 2800 टक्के नफा कमावला आहे. आशिष कचोलिया आणि सुनील सिंघानिया यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनी देखील या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. ‘नॉलेज मॅरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1450 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,072.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
5 मे 2021 रोजी ‘नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स’ कंपनीचे शेअर्स 37 रुपयेवर ट्रेड करत होते. 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1079 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्सनी मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 2816 टक्के परतावा कमावून दिला आहे.
जर तुम्ही 5 मे 2021 रोजी ‘नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 29.25 लाख रुपये झाले असते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 210.10 रुपये होती.
गुंतवणुकीवर परतावा :
मागील एका वर्षात नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 308 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी 4 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 264 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 4 मे 2023 रोजी हा स्टॉक 1079 रुपयांवर पोहचला होता. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 49 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीमध्ये प्रमोटरनी 67.09 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर कंपनीमध्ये सार्वजनिक शेअरहोल्डिंग 32.91 टक्के आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		