
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये क्लोज झाला आहे. नुकताच एथर इंडस्ट्रीज कंपनीने केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीला एक मोठी ऑर्डर दिली आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 2,302.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
नुकताच केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीला 15 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 388.55 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीवर ट्रेड करत होते.
KPI ग्रीन एनर्जी कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या KPIG एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्यूसर विभागांतर्गत 15 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. हा प्रकल्प 2024-25 या आर्थिक वर्षात टप्याटप्प्यात पूर्ण केले जाणार आहेत.
जानेवारी 2024 या महिन्यात, केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या उपकंपनीला स्कायबिन पेपर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 5 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिले होते. याशिवाय कंपनीला श्री वरुडी पेपर मिल कंपनीने देखील 5.60 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिले होते.
केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. म्हणजेच ही कंपनी आपल्या विद्यमान पात्र शेअरधारकांना 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट म्हणून 15 फेब्रुवारी 2024 हा दिवस निश्चित केला आहे. डिसेंबर 2023 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 53.08 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 46.92 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.