30 April 2025 9:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

KPI Green Energy Share Price | ऊर्जा क्षेत्रातील या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या फेवरेट लिस्टमध्ये, 2 वर्षांत 2200 टक्के परतावा

KPI Green Energy Share Price

KPI Green Energy Share Price | ‘KPI ग्रीन एनर्जी’ या अक्षय ऊर्जा आणि बांधकाम क्षेत्रात सेवा देणाऱ्या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी बंपर परतावा कमावला आहे. या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 83 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 22 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. ‘KPI ग्रीन एनर्जी’ कंपनीने नुकताच UAE मधील Tristar Transport फर्म सोबत विविध देशांमध्ये अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा करार केला आहे. आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.96 टक्के घसरणीसह 503.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कंपनीचा नवीन प्रोजेक्ट :
KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने गुजरातमधील भावनगर या ठिकाणी 26.1 MW क्षमतेचा पवन-सौर हायब्रीड ऊर्जा प्रकल्प स्थापन केला आहे. या प्रकल्पामध्ये भावनगर शहरमधील भुंगार साइटवर 16.1 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प आणि 10 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बनवण्यात आला आहे. गुजरात राज्य पवन-सौर हायब्रिड पॉवर पॉलिसी 2018 अंतर्गत या प्रकल्पची सुरुवात करण्यात आली आहे. ही कंपनी या पवन-सौर संकरित ऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणारी वीज व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना पुरवणार आहे.

स्टॉकची कामगिरी :
केपीआय ग्रीन एनर्जी या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18.29 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 28.06 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 83.85 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत हा स्टॉक 2200 टक्के वाढला आहे.

एप्रिल 2021 मध्ये या कंपनीचे शेअर्स 21.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 488 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे 23 पट वाढले आहेत. जर तुम्ही दोन वर्षांपूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 23 लाख रुपये झाले असते.

कंपनीबद्दल थोडक्यात :
KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी नवीकरणीय ऊर्जा आणि बांधकाम सेवा प्रदान करण्याचे काम करते. कंपनी सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांची रचना आणि निर्मिती क्षेत्रात गुंतलेली आहे. KPI ग्रीन एनर्जी कंपनीने सुरतमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प विकसित केला आहे. कंपनी प्रकल्पांची निर्मिती करते, भागीदारी करते, चालवते आणि देखरेख करण्याचे काम देखील करते. आता कंपनीने सौर-पवन हायब्रीड उर्जा व्यवसायातही व्यापार विस्तार केला अजे. या कंपनीचे बाजार भांडवल 1,764 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPI Green Energy Share Price Today on 28 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

KPI Green Energy Share Price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या