
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो या अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने तब्बल 2947.4 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 15.5 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीने मागील वर्षीच्या डिसेंबर 2022 तिमाहीत 2553 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्क्यांच्या वाढीसह 3633.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 1.03 टक्के घसरणीसह 3,444.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत लार्सन अँड टुब्रो कंपनीचा महसूल मागील वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत 18.8 टक्क्यांच्या वाढीसह 55127.8 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत या कंपनीने 46389 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. डिसेंबर 2023 रोजी तिमाहीत समूह स्तरावर कंपनीला 75990 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत.
वार्षिक आधारावर कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये 25 टक्क्यांची मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत लार्सन अँड टुब्रो कंपनीचा EBITDA 13.5 टक्क्यांच्या वाढीसह 5759.1 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा EBITDA 5073 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
मागील एका वर्षात लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 71 टक्के परतावा कमावून दिला आहे. 31 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2125.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 30 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3633.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 6 महिन्यांत लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 36 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल्या सहा महिन्यात लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 2679.90 रुपयेवरून वाढून 3633.40 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 5 वर्षांत लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 174 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.