
L&T Share Price | काल 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार झालोत. या विधीत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला होता. या मंदिराचे डिझाईन, अभियांत्रिकी कार्य लार्सन अँड टुब्रो कंपनीने केले आहे.
लार्सन अँड टुब्रो कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनात माहिती दिली की, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या आदेशानुसार लार्सन अँड टुबो कंपनीने श्री रामजन्मभूमी मंदिराचे डिझाइन आणि बांधकाम कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. हे श्री राम मंदिर भारतीय स्थापत्यशास्त्राच्या क्षेत्रात करण्यात आलेले एक मोठे यश आहे. या मंदिराचा विस्तार जवळपास 70 एकर जागेवर आहे. या भव्य मंदिराची बांधकाम रचना प्राचीन नागर वास्तुशैली प्रमाणे करण्यात आली आहे. राम मंदिराची एकूण उंची 161.75 फूट, आणि लांबी 380 फूट आणि रुंदी 249.5 फूट आहे.
आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 1.28 टक्के घसरणीसह 3,588.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स पुढील काळात मजबूत वाढू शकतात. तज्ञांच्या मते, लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 4400 रुपये किंमत स्पर्श करतील.
लार्सन अँड टुब्रो कंपनीने बांधलेले हे मंदिर, तीन मजली उंच असेल. यात मुख्य शिखरासह नृत्य मंडप, रंगमंडप, गुढ मंडप, कीर्तन मंडप आणि प्रार्थना मंडप असे पाच मंडप उभारले जाणार आहेत. लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी एका निवेदनात आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हंटले की, “श्री रामजन्मभूमी मंदिराची रचना आणि बांधकाम करण्यासाठी आम्हाला जी संधी सरकारने दिली, त्याबद्दल आम्ही सरकारचे आभार व्यक्त करतो”.
लार्सन अँड टुब्रो कंपनी 23 अब्ज डॉलर बाजार भांडवल असलेली भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः अभियांत्रिकी, बांधकाम प्रकल्प, उच्च-तंत्रज्ञान उत्पादन यासारख्या सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. लार्सन अँड टुब्रो कंपनी जगभरात 50 पेक्षा जास्त देशांमध्ये व्यवसाय करते.
UBS ने आपल्या नवीन अहवालात लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राईस 4,400 रुपये जाहीर केली आहे. तर Elara Capital फर्मने लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या स्टॉकवर 3,750 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांनी लार्सन अँड टुब्रो स्टॉक दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.