
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या हेवी इंजीनियरिंग युनिटने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून अनेक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवले आहेत. एल अँड टी कंपनीला मिळालेल्या अनेक कॉन्ट्रॅक्टचे मूल्य 1000 ते रु 2500 कोटी दरम्यान असते. अशा कॉन्ट्रॅक्टला एल अँड टी कंपनी ‘मोठे कॉन्ट्रॅक्ट’ म्हणते. नुकताच एल अँड टी कंपनीच्या हेवी इंजिनिअरिंगचे मॉडिफिकेशन, रिव्हॅम्प अँड अपग्रेड युनिटला एका मोठ्या प्रमुख तेल आणि वायू कंपनीने महत्त्वाचे डिबॉटलनेकिंग प्रकल्पाचे काम दिले आहे. आज बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी एल अँड टी कंपनीचे शेअर्स 1.38 टक्के वाढीसह 3,600 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
नुकताच एल अँड टी कंपनीला गुजरात रिफायनरीचे काम करण्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. मागील काही वर्षापासून MRU व्यवसायाने पश्चिम आशिया खंडात निर्माण होणाऱ्या विविध संधींवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. एल अँड टी कंपनीला मिळालेला हा कॉन्ट्रॅक्ट पश्चिम आशियातील MRU व्यवसायातील एक मोठी उपलब्धी मानली जात आहे.
सेबीला दिलेल्या माहितीनुसार, लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या MRU व्यवसाय युनिटने इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या गुजरात रिफायनरीकडून कोक ड्रम दुरुस्ती प्रकल्प ताब्यात घेतला आहे. नुकताच एल अँड टी कंपनीने ऑईल रिफायनरी प्रकल्पासाठी उच्च दाब उष्णता एक्सचेंजर तयार करण्याचे काम मिळवले आहे. लार्सन अँड टुब्रो ही भारतीय कंपनी 23 अब्ज डॉलर्स बाजार भांडवल असलेली बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून ओळखली जाते.
अयोध्येतील प्रसिद्ध श्रीराम मंदिर एल अँड टी कंपनीने निर्माण केले आहे. या राम मंदिराची रचना, अभियांत्रिकी आणि बांधकाम सबंधित कार्य लार्सन अँड टुब्रो कंपनीने केले आहे. भरतपूर जिल्ह्यातील खाणीतून मिळालेल्या गुलाबी बन्सी पहारपूर दगडांपासून अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. हे मंदिर मोठ्या तीव्रतेचे भूकंप सहन करण्यास देखील सक्षम आहे.
या राम मंदिरात एकूण 390 खांब आहेत. प्रत्येक मजल्यावर असलेल्या सर्व खांबावर 10,000 पेक्षा जास्त शिल्पे आणि अतिशय कठीण असे कोरीव काम केलेले आहेत. मागील एका वर्षात एल अँड टी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 62.86 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते पुढील काळात एल अँड टी कंपनीचे शेअर्स आणखी तेजीत वाढू शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.