13 April 2024 2:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 13 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | कुबेर पावला! या शेअरने अवघ्या 1 वर्षात दिला 1528% परतावा, पुढेही मल्टिबॅगर परतावा? Stocks in Focus | कोलते पाटील डेव्हलपर्स शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, अल्पावधीत 35 टक्के परतावा मिळेल Tata Nexon | खुशखबर! टाटा नेक्सॉन EV कार खरेदीवर 50 हजारांचा डिस्काऊंट, शो-रुम'मध्ये बुकिंगला गर्दी Oriental Rail Infra Share Price | 38 रुपयाच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदार मालामाल, 1 वर्षात 550% परतावा दिला Tanla Share Price | तान्ला प्लॅटफॉर्म्स शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, खरेदीचा सल्ला
x

L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल, कंपनी ऑर्डरबुकमध्ये अफाट वाढ होतेय

L&T Share Price

L&T Share Price | लॉर्सन अँड टुब्रो या मजबूत फंडामेंटल्स असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. ग्लोबल ब्रोकरेज फर्म CLSA ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 30 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. आज गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी लॉर्सन अँड टुब्रो स्टॉक 0.037 टक्के वाढीसह 3,471.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

CLSA फर्मच्या अहवालानुसार लॉर्सन अँड टुब्रो कंपनीच्या ऑर्डरचा प्रवाह अपेक्षेपेक्षा खूप चांगला असून कंपनीला भारतीय बाजारातून देखील मोठ्या ऑर्डर्स मिळत आहेत. लॉर्सन अँड टुब्रो कंपनीकडे बुलेट ट्रेन आणि डिफेन्स सेक्टरमधील अनेक ऑर्डर्स प्रलंबित आहे. नुकताच भारताच्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने अनेक मोठ्या डिफेन्स ऑर्डर्सला मंजुरी दिली आहे. पुढील काळात लॉर्सन अँड टुब्रो कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 6.3 लाख कोटी रुपयेवर जाण्याची शक्यता आहे.

तज्ञांच्या मते, चालू आर्थिक वर्षाचा मार्च तिमाहीपासून लॉर्सन अँड टुब्रो कंपनीच्या मार्जिनमध्ये सुधारणा होईल. अनुशेषातील घटत्या लेगेसी ऑर्डरमुळे कंपनीच्या मार्जिनमध्ये सुधारणा पाहायला मिळू शकते. सध्या लॉर्सन अँड टुब्रो कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 4.69 लाख कोटी रुपये आहे.

डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 22 टक्के वाढ झाली आहे. कंपनीला पॉवर सेक्टरमधून मिळणाऱ्या ऑर्डरमधे सर्वाधिक म्हणजेच 47 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या व्यवसाय वाढीचे संकेत पाहून ब्रोकरेज फर्म CLSA ने लॉर्सन अँड टुब्रो स्टॉकवर 4360 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | L&T Share Price today NSE Live 29 February 2024.

हॅशटॅग्स

L&T Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x