
LIC Share Price | ‘लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘LIC’ या सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या गुंतवणूकदारांना मोठा दणका बसला आहे. LIC कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर आपल्या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीवर आले आहेत. एलआयसी कंपनीच्या शेअर्सने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 52 आठवड्यांची नवीन नीचांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. हा स्टॉक 27 फेब्रुवारी 2023 रोजी स्पर्श केलेल्या 566 रुपये या नीचांक किमतीच्या खाली घसरुन 562 रुपये किमतीवर आला आहे. (Life Corporation of India Limited)
LIC कंपनीचे शेअर्स खोलात :
LIC कंपनीचे शेअर्स आपल्या लिस्टिंगच्या दिवशी 875.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत एलआयसी कंपनीचे शेअर्स सुमारे 36 टक्के कमजोर झाले आहेत. त्याच वेळी एलआयसी कंपनीचे शेअर्स या वर्षात आतापर्यंत सुमारे 21 टक्के कमजोर झाले आहेत. 2 जानेवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर या विमा कंपनीचे शेअर्स 709.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 24 मार्च 2023 रोजी BSE इंडेक्सवर मध्ये 562 किमतीवर पोहोचले आहेत. LIC कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 920 रुपये होती. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.56 टक्के घसरणीसह 559.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ही शेअरची सध्याची नवीन नीचांक किंमत पातळी आहे.
LIC कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 949 रुपये निश्चित केली होती. 45 रुपयांच्या सवलतीवर एलआयसी कंपनीचे शेअर्स सामान्य गुंतवणूकदारांना 904 रुपयांवर वाटप करण्यात आले होते. पॉलिसीधारकाना एलआयसी कंपनीच्या आयपीओमध्ये प्रति शेअर 50 रुपयांची सूट देण्यात आली होती. आणि त्यांना एक शेअर 889 रुपये किमतीवर देण्यात आला होता. एलआयसी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 45 रुपये सवलत देण्यात आली होती. आणि त्यांना एक शेअर 904 रुपये किमतीची वाटप करण्यात आला होता. LIC कंपनीचा IPO एकूण 2.95 पट सबस्क्राइब झाला होता. या IPO रिटेल कोटा 1.99 पट आणि पॉलिसीधारकांचा कोटा 6.12 पट सबस्क्राइब झाला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.