
Multibagger Stocks | शेअर बाजारात दोन स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स ट्रेडर्स च्या रडारवर आले आहेत, जे मागील दोन आठवड्यांपासून कमालीचे प्रदर्शन करत आहेत. या स्टॉकमधील वाढीचा परिणाम असा झाला की, त्यावर पैसे लावणारे लोक एका आठवड्याभरात मालामाल झाले आहेत. आपण ज्या दोन कंपनीच्या शेअर्सबद्दल चर्चा करणार आहोत, त्यांचे नाव आहे, SBEC शुगर लिमिटेड आणि नर्मदा जिलेटिन्स लिमिटेड. या दोन्ही कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांची अप्पर सर्किट लागला होता. या वाढीसह हे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नवीन उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत होते. चला तर मग जाणून घेऊ या दोन्ही स्टॉक बद्दल थोडक्यात
SBEC शुगर लिमिटेड : SBEC Share Price
या कंपनीचे शेअर्स सतत 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत स्पर्श करत आहेत. मागील आठवडाभरापासून या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर 64.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. मागील 12 ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. यादरम्यान हा शेअर 23 रुपयांवर ट्रेड करत होता, ज्यात आता वाढ झाली असून शेअर 64.15 रुपयांवर पोहचला आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 178.91 टक्के परतावा कमावला आहे. सततच्या तेजीनंतर स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीने कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले होते, मात्र एसबीईसी कंपनीने आमच्याकडे शेअरमधील अचानक वाढीबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सेबीला कळवले आहे.
नर्मदा जिलेटिन्स लिमिटेड : Narmada Gelatines Share Price
नर्मदा जिलेटिन्स लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांची वाढीसह 539.20 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 140.98 टक्के परतावा कमावून दिला आहे. नर्मदा जिलेटिन कंपनीच्या शेअर्समध्ये ही अचानक आलेली वाढ विशेष अंतरिम लाभांश जाहीर केल्यावर पाहायला मिळाली आहे. विशेष रसायन उत्पादन क्षेत्रात व्यापार करणाऱ्या या कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 100 रुपये विशेष लाभांश देण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने मागील आठवड्यात स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली होती, की कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर 1000 टक्के म्हणजेच 100 रुपये प्रति शेअर विशेष अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी कंपनी हा विशेष लाभांश वाटप करणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.