
Lloyds Metals Share Price | लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीच्या शेअर्सने सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजी नोंदवली होती. काल हा स्टॉक 7 टक्क्यांच्या वाढीसह 582.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. इंट्रा-डे ट्रेडमध्ये लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीचे शेअर्स 583.85 रुपये उच्चांकावर पोहचले होते.
13 जुलै 2023 रोजी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला 1 रुपये दर्शनी मूल्याचे 504.8 दशलक्ष इक्विटी शेअर्स लिस्टिंगसाठी सेबीकडून मंजूरी देण्यात आली आहे. तर 17 जुलै 2023 रोजी हे शेअर्स सूचीबद्ध केले जातील, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
शेअरची कामगिरी :
आज मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीचे शेअर्स 3.07 टक्के घसरणीसह 545.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 43.47 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 12.39 टक्के मजबूत झाले आहेत. मागील सहा महिन्यात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 93.34 टक्के परतावा कमावून दिला आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड ही कंपनी मुख्यतः लोह आणि पोलाद निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करते. कंपनीचे ऑपरेशन संपूर्ण नागपूरमधून चालते. LMEL ही महाराष्ट्र राज्यातील एकमेव लोहखनिज खाणकाम कंपनी आहे. कंपनी 270,000 टन डायरेक्ट रिड्यूस आयर्न आणि 30 MW कॅप्टिव्ह पॉवर प्लांटसह वार्षिक 10 दशलक्ष टन लोह उत्पादन करते.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनीला 2007 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात सूरजागढ गावात लोह खाणीसाठी जमीन भाडेपट्टी करारावर देण्यात आली आहे. सुरुवातीला हा भाडे करार 20 वर्षांसाठी करण्यात आला होता, मात्र नंतर MMDR कायदा 2018 अंतर्गत हा भाडे करार 50 वर्षांसाठी वाढविण्यात आला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.