
Lloyds Share Price | मागील 4 वर्षांत लॉयड इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. चार वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 1 रुपये किमतीवर ट्रेड कर होते. तर आता हा स्टॉक 85 रुपये किमतीवर पोहचला आहे. 16 ऑक्टोबर 2020 रोजी लॉयड इंजिनिअरिंग स्टॉक 0.63 पैसे किमतीवर ट्रेड करत होता. ( लॉयड इंजिनिअरिंग कंपनी अंश )
एप्रिल 2021 पासून या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी निर्माण झाली आणि शेअरची किंमत 85 रुपये किमतीवर पोहचली. आज गुरूवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी लॉयड इंजिनिअरिंग स्टॉक 0.42 टक्के घसरणीसह 84.70 रुपये किमतींवर ट्रेड करत आहे.
जर तुम्ही 2020 मध्ये लॉयड इंजिनिअरिंग स्टॉकमध्ये 0.63 पैसे किमतीवर असताना 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 1,58,730 शेअर्स मिळाले असते. सध्याच्या किमतीनुसार तुमच्या शेअरचे मूल्य 1.34 कोटी रुपयेपेक्षा जास्त झाले असते. जर तुम्ही 2020 मध्ये या स्टॉकवर 10,000 रुपये जरी लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 13 लाखांपेक्षा जास्त झाले असते. अवघ्या 4 वर्षांपेक्षा कमी कालावधीत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13400 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
लॉयड इंजिनिअरिंग कंपनीची स्थापना 1974 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः हायड्रोकार्बन क्षेत्र, तेल आणि वायू, पोलाद संयंत्रे, उर्जा प्रकल्प, अणु संयंत्र बॉयलर आणि टर्नकी प्रकल्पांसाठी जड उपकरणे, यंत्रसामग्री आणि प्रणालींचे डिझाइन, उत्पादन आणि कार्यान्वित करण्याचा व्यवसाय करते. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने 94.2 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2023-24 आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत लॉयड इंजिनिअरिंग कंपनीने 21 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर तिमाहीत या कंपनीने 27 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत लॉयड इंजिनिअरिंग कंपनीने फक्त 6 कोटी रुपये नफा कमावला होता. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 34.81 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात लॉयड इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सची किंमत 90 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.