
Loan Settlement | आपल्या अयुष्यात सुख:मागून दु:ख येतच असते. घराचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी बॅंक आपल्याला कर्ज स्वरुपात मदत करते. मात्र सलग ३ महिने कर्जाचे हप्ते भरले नाही तर आपले नाव डिफॉल्टरच्या यादीत शामिल होते. यावर बॅंक पुढे त्यांच्या नियमानुसार कारवाइ करते. अशात तुमचे हक्काचे घर देखील तुमच्याकडून काढून घेतले जाण्याची शक्यता असते. मात्र तसे होउ नये यासाठी अनेक जण सेटलमेंटची विनंती करतात. बॅंक देखील काही व्यक्तींना ही संधी देते.
यात तुमची मुळ रक्कम पुर्ण भरायची असते. तुमचे व्याज कमी केले जाते किंवा काही टक्के सुट दिली जाते. तसेच यात एक रकमी व्यवहार होतो. तुम्हाला तुमचे मुळ कर्ज एकाच वेळी फेडावे लागते. यासाठी बॅंक तुम्हाला काही दिवसांचा अवधी देते. मात्र असे करण्याचे फायदे काय आणि तोटे काय हे आपल्याला महीत असायला हवे.
सेटलमेंटमध्ये कर्ज बंद होत नाही
जेव्हा तुम्ही सेटलमेंटचा पर्याय निवडता तेव्हा तुम्हाला तुमचे कर्ज पुर्ण भरल्याशिवाय सुटका नसते. एक रुपयाही न चुकवता बॅंकेला द्यावा लागतो. त्यावर तुमचे कर्ज पूर्ण फेडले गेल्यावरच तुम्ही आझाद होता. अनेकांना सेटलमेंट म्हणजे सुटका असे वाटते, मात्र ते चुकीचे आहे.
तसेच जेव्हा तुम्ही सेटलमेंटचा पर्याय निवडता तेव्हा तुमचे खुप नुकसान होते. यामध्ये आधी तुम्हाला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जातेय. तुमचा क्रेडिट स्कोर घसरतो. हा क्रेडिट स्कोर जवळपास १० टक्क्यांपर्यंत खाली येतो. तसेच पुढील सात वर्ष तो कायम मानला जातो. त्यामुळे भविष्यात तुम्हाला अर्जंट कर्जाची गरज भासली तर कोणतीही बॅंक किंवा वित्त संस्था तुम्हाला कर्ज देत नाही.
क्रेडिट स्कोर सुधारण्याचा एक पर्याय आहे. पहिले म्हणजे तुम्ही सेटलमेंटचा पर्याय निवडू नका आणि दुसरे म्हणजे जर निवडलाच तर कर्ज आणि इतर रक्कम देखील पूर्ण भरा. पैसे नसताना तुम्ही सेटलमेंट केल्यावर तुमचे खाते चालू राहते. त्यामुळे क्रेडीट स्कोरवर ते दिसते. ते टाळण्यासाठी जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा उर्वरीत व्याज आणि इतर रक्कम भरूण घ्या तसेच ते खाते बंद करा. यात तुम्हाला नो ड्यूचे सर्टीफीकेट मिळते. तसेच बॅंक क्रेडिट स्कोरशी संपर्क साधून तुमचे खाते बंद झाल्याचे कळवते. यामुळे तुमचा क्रेडीट स्कोर चांगला आहे असे दिसते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.