
Lotus Chocolate Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स कंपनीने ‘लोटस चॉकलेट्स’ कंपनीमधील 51 टक्के कंट्रोलिंग भाग भांडवल पूर्णपणे ताब्यात घेतले आहे. रिलायन्स रिटेल कंपनीने आपल्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सद्वारे लोटस चॉकलेट्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत.
शेअरमध्ये दररोज अप्पर सर्किट
त्यामुळे लोटस चॉकलेट्स कंपनीच्या शेअरमध्ये दररोज अप्पर सर्किट लागत आहे. 9 फेब्रुवारी 2023 रोजी लोटस चॉकलेट्स कंपनीचे शेअर्स 480.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 152.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
डीलचे पूर्ण तपशील :
लोटस चॉकलेट्स कंपनीचे अधिग्रहण 74 कोटी रुपयेमध्ये झाले आहे. या अंतर्गत रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीने लोटस चॉकलेट कंपनीचे 6548935 शेअर्स 113 रुपये प्रति शेअर किमतीवर खरेदी केले होते. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात या डीलची माहिती सार्वजनिक जाहीर करण्यात आली आणि लोटस चॉकलेट्स कंपनीचे शेअर्स तेजीत आले. रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, लोटस चॉकलेट कंपनी आणि लोटस प्रवर्तक समूहाच्या इतर सदस्यांनी या करारावर स्वाक्षरी करून डील पूर्ण केली.
कंपनीबद्दल थोडक्यात :
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स ही कंपनी मुख्यतः किराणा, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, जीवनशैली आणि फार्मा या क्षेत्रात व्यवसाय करते. कंपनीकडे एकूण 18,040 स्टोअर्स आणि डिजिटल कॉमर्स प्लॅटफॉर्मचे ओम्नी चॅनल नेटवर्क आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात रिलायन्स रिटेल व्हेंचर्स कंपनीने 2.6 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आणि त्यात त्यांनी 9181 कोटी रुपये नफा कमावला आहे. लोटस चॉकलेट ही कंपनी मुख्यतः चॉकलेट, कोको उत्पादने, कोको डेरिव्हेटिव्हज बनवण्याचे काम करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.