
Loyal Equipments Share Price | शेअर बाजारात अनेक लोक गुंतवणूकीसाठी चांगले शेअर्स शोधत असतात. मात्र त्यांना चांगले शेअर्स मिळत नाही. आज या लेखात आम्ही तुम्हाला एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत. या स्टॉकचे नाव आहे, लॉयल इक्विपमेंट्स लिमिटेड. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लॉयल इक्विपमेंट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 127 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 5 दिवसांत लॉयल इक्विपमेंट्स कंपनीचे शेअर्स 109 रुपयेवरून वाढून 127 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात स्टॉकने गुंतवणूकदारांना 10.60 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.66 टक्के घसरणीसह 129.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 1 महिन्यात 71.35 टक्के परतावा दिला
मागील 1 महिन्यात, लॉयल इक्विपमेंट्स कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 71.35 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 71 रुपये वरून वाढून 127 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. लॉयल इक्विपमेंट्स कंपनीचे शेअर्स 9 डिसेंबर 2022 रोजी 48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 12 मे रोजी, लॉयल इक्विपमेंट्स कंपनीचे शेअर्स 68 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या काळात गुंतवणूकदारांचे भांडवल दुप्पट झाले आहे.
लॉयल इक्विपमेंट्स लिमिटेड कंपनीने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटसह 127 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील काही दिवसांत लॉयल इक्विपमेंट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मजबूत वाढले आहेत. लॉयल इक्विपमेंट्स कंपनीला नुकताच नुमालीगढ रिफायनरी कंपनीकडून 11 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.
लॉयल इक्विपमेंट्स लिमिटेड या अभियांत्रिकी कंपनीची स्थापना 1993 साली अहमदाबाद, गुजरात येथे झाली होती. लॉयल इक्विपमेंट्स लिमिटेड कंपनी औद्योगिक आणि अभियांत्रिकी उपकरणे बनवण्याचे काम करते. लॉयल इक्विपमेंट कंपनीचे बाजार भांडवल 130 कोटी रुपये आहे.
मागील 6 महिन्यांत 160 टक्के परतावा दिला
मागील 5 वर्षांत लॉयल इक्विपमेंट्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने लोकांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत, लॉयल इक्विपमेंट कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 160 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.