 
						Maan Aluminium Share Price | मान अॅल्युमिनिअम कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर ट्रेड करत होते. स्टॉक अप्पर सर्किट हीट केल्यावर 298.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मान अॅल्युमिनिअम कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 9 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या दिवशी कंपनी शेअर्सचे विभाजन करण्यावर आणि गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्यावर विचार करू शकते. आज बुधवार दिनांक 7 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.88 टक्के वाढीसह 310.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षात दिला 145 टक्के परतावा
सेबीला दिलेल्या माहितीत मान अॅल्युमिनिअम कंपनीने म्हंटले आहे की, कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स विभाजित करणार आहे. यासोबत कंपनी आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स देखील वाटप करणार आहे. 9 जून 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी निर्णय घेईल. मागील एका वर्षात मान अॅल्युमिनियम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 163.14 टक्के परतावा कमावून दिला आहे.
कंपनीची आर्थिक परिस्थिती
मान अॅल्युमिनियम कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये जबरदस्त कामगिरी केली असल्याचे आपण तिमाही निकालावरून पाहू शकतो. कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर 42 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात एकूण 131 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मान अॅल्युमिनिअम कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी समाधानकारक गोष्ट म्हणजे कंपनीच्या निर्यातीत 35 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		