
Macrotech Developers Share Price | ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आता बोनस शेअर्स वितरणाच्या रेकॉर्ड तारीखमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख बदलली आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीचे शेअर्स 0.036 टक्के घसरणीसह 974.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मॅक्रोटेक डेव्हलपर्स नवीन रेकॉर्ड डेट :
‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीने यापूर्वी केलेल्या घोषणेमध्ये बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड डेट 26 मे 2023 निश्चित केली होती. मॅक्रोटेक डेव्हलपर्स कंपनीने सेबीला कळवले होते की, कंपनीने आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर एक बोनस शेअर मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी कंपनीने आता 31 मे 2026 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून घोषित केला आहे.
‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीने नुकताच मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीने 3255.38 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी कंपनीला याच तिमाही काळात 5.5 टक्के तोटा सहन करावा लागला होता.
याशिवाय मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 3271.71 कोटी रुपये कमाई केली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मॅक्रोटेक डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स 1.55 टक्क्यांच्या घसरणीसह 968 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परकी किंमत 1189 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 711 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.