Maharashtra Seamless Share Price | गुंतवणूकदारांची चांदी! महाराष्ट्र सीमलेस शेअरने 13,474 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या

Maharashtra Seamless Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये महाराष्ट्र सीमलेस कंपनीच्या स्टॉकमध्ये 5 टक्क्यांची मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. आणि शेअरची किंमत 495.65 रुपये या नवीन उच्चांक किमतीवर पोहचली होती. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. महाराष्ट्र सीमलेस कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एक निवेदन जाहीर झाल्यानंतर पाहायला मिळाली आहे.

कंपनीने 234 कोटी रुपये प्रलंबित कर्जे परतफेड केले

महाराष्ट्र सीमलेस कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीने 234 कोटी रुपये प्रलंबित कर्जे परतफेड केले असून, कंपनी आता पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी महाराष्ट्र सीमलेस कंपनीचे शेअर्स 0.81 टक्के वाढीसह 484.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

कंपनीची मजबूत ऑर्डर बुक

महाराष्ट्र सीमलेस कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीने 09 जून 2023 रोजी दीर्घकालीन कर्जाची ऐच्छिक प्रीपेमेंट म्हणून 234 कोटी रुपये जमा केले आहेत. कंपनीची मजबूत ऑर्डर बुक आणि मजबूत तरलता स्थिती पाहता कंपनीमे पूर्णपणे कर्जमुक्त होण्यासाठी कर्ज परतफेड केले आहेत. मागील 8 महिन्यांत महाराष्ट्र सीमलेस कंपनीने दुसऱ्यांदा दीर्घकालीन कर्जाच्या ऐच्छिक प्रीपेमेंट केली आहे, अशी माहिती कंपनीने सेबीला दिली आहे.

गुंतवणूकदारांना आतापर्यंत 13,474.44 टक्के परतावा दिला

महाराष्ट्र सीमलेस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत 13,474.44 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात महाराष्ट्र सीमलेस कंपनीच्या शेअरची किंमत 3.56 रुपयेवरून वाढून 484.65 रुपयेवर पोहचली आहे.

मागील 5 वर्षांत 112.28 टक्के परतावा दिला

मागील पाच वर्षांत महाराष्ट्र सीमलेस कंपनीने आपल्या शेअर धारकांना 112.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 56.05 टक्के नफा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 50.50 टक्के मजबूत झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Maharashtra Seamless Share Price today on 13 June 2023.