
Man Infra Share Price | मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. दरम्यान, बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 74245 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्ट-50 निर्देशांक 22519 अंकांवर क्लोज झाला होता. ( मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनी अंश )
शुक्रवारी टॉप गेनर स्टॉकमध्ये आयशर मोटर्स, कोटक बँक, हिंदाल्को आणि महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत होते. तर टॉप लूझर स्टॉकमध्ये सन फार्मा, टायटन, सिप्ला आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होते. आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स 1.37 टक्के घसरणीसह 212.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजार विक्रीच्या दबावात असताना मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांच्या वाढीसह 215 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समधे जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. मॅन इन्फ्रा ही कंपनी मुंबईमध्ये रिअल इस्टेट व्यवसाय करते. Axis Securities फर्मने मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअर्सचे कव्हरेज सुरू केल्याची माहिती दिली आहे.
ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअर्सवर 270 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7930 कोटी रुपये आहे. मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 245 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 77 रुपये होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 13 टक्के वाढली आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 1 वर्षात मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 171 टक्के नफा कमावून दिला आहे. मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स 78 रुपये या आपल्या नीचांकी किंमत पातळीवरून 171 टक्के वाढले आहेत. सध्या या कंपनीचे शेअर्स 210 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. कोरोना महामारीच्या काळात मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनीचे 11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीवरून हा स्टॉक 1900 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.