
Mazagon Dock Share Price | गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनी शेअर 2.13 टक्क्यांनी वाढून 2,336.45 रुपयांवर पोहोचला होता. भारत सरकारच्या ७०,००० कोटी रुपयांच्या पाणबुडी प्रकल्पासाठी लार्सन टुब्रो कंपनीची बोली अपात्र ठरल्याच्या वृत्तानंतर माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. कारण या प्रकल्पाच्या टेंडरसाठी आता शर्यतीत केवळ माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनी आहे. मात्र अद्याप या प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
प्रकल्पासाठी माझगाव डॉकची निविदा
सीएनबीसी टीव्ही 18 वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ‘केंद्र सरकारच्या तांत्रिक देखरेख समितीने असे निश्चित केले आहे की केवळ माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडआणि जर्मनीच्या थिसेनक्रुप मरीन सिस्टम्स कंपनीने सादर केलेल्या निविदा पात्रतेच्या अटींची पूर्तता करतात.
मात्र, लार्सन अँड टुब्रो आणि स्पेनची नवांतिया यांची संयुक्त बोली प्रकल्पासाठीची निविदा निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याची अपडेट समोर आली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील डिफेन्स एक्विझिशन कौन्सिलची लवकरच बैठक होऊ शकते. त्या बैठकीत कॉन्ट्रॅक्ट कोणाला देण्यात यावा हे निश्चित होऊ शकतं असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
माझगाव डॉकच्या शेअरमध्ये वर्षभरात 110 टक्क्यांनी वाढ
गेल्या १ वर्षात माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनी शेअरने ११० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या 5 वर्षात माझगाव डॉक कंपनी शेअरने गुंतवणूकदारांना 2690 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. १६ ऑक्टोबर २०२० रोजी माझगाव डॉक कंपनीचा शेअर ८४.०३ रुपयांवर ट्रेड करत होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.