30 April 2025 9:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Minimum Salary of EPF | पगारदारांनो! तुमचा किमान पगार किती आहे? कारण पेन्शनची रक्कम वाढणार, नवा प्लॅन लक्षात ठेवा

Minimum Salary of EPF

Minimum Salary of EPF | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत (ईपीएफओ) ईपीएफ खातेधारकांचे किमान वेतन १५ हजार रुपये होती. आता ती वाढवून २१ हजार रुपये करण्यात आली आहे. एका अहवालानुसार, सरकारने असे केल्याने कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये (ईपीएस) योगदानाच्या रकमेवर परिणाम होणार आहे. यासोबतच ईपीएफची रक्कमही वाढू शकते.

गेल्यावेळी सरकारने सप्टेंबर 2014 मध्ये कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात वाढ केली होती. आता पुन्हा एकदा या कर्मचाऱ्यांच्या पगार मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, पगार वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ योगदानातही वाढ होईल आणि कर्मचारी पेन्शन योजनेत (ईपीएस) गुंतवणूक करणाऱ्यांचे योगदानही वाढू शकते.

पेन्शनचे योगदान किती वाढेल
याआधी, कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) खात्यातील योगदानाची गणना मूळ वेतन दरमहा १५,००० रुपये ग्राह्य धरून केली जातं असे. त्यामुळे ईपीएस खात्यात जास्तीत जास्त योगदान दरमहा १,२५० रुपयांपर्यंत जातं होते. मात्र केंद्र सरकारने वेतनमर्यादा वाढवून २१ हजार रुपये केल्याने, योगदान देखील वाढले आहे. तज्ज्ञ म्हणाले त्यानुसार, “मासिक ईपीएस योगदान १७४९ रुपये (२१,००० रुपयांच्या ८.३३%) असेल.

सेवानिवृत्तीवर अधिक पेन्शन
या वाढीनंतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवर अधिक पेन्शन दिली जाणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पेन्शनेबल सेवा कालावधी 32 वर्षांचा असेल तर मासिक वेतन हे निवृत्तीपूर्वी 60 महिन्यांचे सरासरी वेतन म्हणून गणले जाईल. मात्र, ६० महिन्यांतील कर्मचाऱ्याचा मूळ पगार दरमहा 21 हजार रुपयांपेक्षा अधिक असेल, तर पेन्शन मोजण्यासाठी 21 हजार रुपये एक महिन्याचा पगार मानला जाईल.

तसेच जर कर्मचाऱ्याने 20 वर्षे काम केले असेल तर जर एखाद्या कर्मचाऱ्याने 20 वर्षांपेक्षा जास्त काम केले असेल तर सेवा कालावधीत 2 वर्षे बोनस म्हणून जोडली जातील. आता ईपीएस सदस्याला मिळणारी मासिक पेन्शन ७२८६ रुपये असेल. त्याचबरोबर पगार वाढल्यास कर्मचारीही ईपीएसमध्ये योगदान देण्यास पात्र ठरतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Minimum Salary of EPF pension scheme check details on 29 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Minimum Salary of EPF(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या