
Mishtann Foods Vs Sarveshwar Foods Share | सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केली होती. या योजने अंतर्गत कंपनीने आपल्या शेअर धारकांना एका शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याची घोषणा केली होती आणि कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यात विभाजित करण्याचा निर्णय घेतला होता.
आता कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. कंपनीने शेअर धारकांची पात्र निश्चित करण्यासाठी जी रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे, ती पुढील आठवड्यात आहे. आज मंगळवारी (12 Sept 2023) सर्वेश्वर फूड्स शेअर 4.60% वाढीसह (NSE) 152.50 रुपयांवर ट्रेड करत आहे.
सर्वेश्वर फूड्स बोनस शेअर रेकॉर्डची तारीख
29 ऑगस्ट 2023 रोजी सर्वेश्वर फूड्स कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले होते की, कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर 10 तुकड्या विभाजित करण्याची घोषणा केली आहे. यासह कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करणार आहे. सर्वेश्वर फूड्स कंपनीने बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिटसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 15 सप्टेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे.
गुंतवणुकीवर परतावा
सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करून होल्ड केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य एका वर्षात दुप्पट झाले आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 72 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स 135 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.