28 May 2024 9:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 29 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | PSU स्टॉकबाबत फायद्याची अपडेट, पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार? यापूर्वी दिला 1150% परतावा IPO GMP | पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, स्वस्त IPO शेअरचा ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका Patel Engineering Share Price | स्टॉक चार्टने दिले संकेत, 59 रुपयाचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Ashok Leyland Share Price | शेअर स्पीड पकडणार! वेगाने परतावा देणार, तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस किती? Gold Rate Today | बोंबला! आज सोन्याचा भाव गगनाला भिडला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HAL Vs BEL Share Price | टॉप 6 शेअर्स स्विंग हाय ब्रेकआउटवर, मजबूत परतावा देणार, संधी सोडू नका
x

Money Making Shares | मार्ग श्रीमंतीचा! 122% परतावा आणि 1000% डिव्हीडंड, हा शेअर पैशाचा पाऊस पडतोय, कमाई करणार?

Money Making Shares

Money Making Shares | नर्मदा जिलेटिन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स सध्या 385 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. याआधी बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटला लागून 350 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नर्मदा जिलेटिन्स लिमिटेड या स्मॉल कंपनीच्या स्टॉक मध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 100 रुपये म्हणजेच 1000 % लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही बातमी येताच स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे.

कंपनीचे स्पष्टीकरण :
नर्मदा जिलेटिन्स लिमिटेड कंपनीने बुधवार दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, “7 डिसेंबर 2022 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती, आणि त्यात प्रति इक्विटी शेअर 100 रुपये विशेष लाभांश वाटप करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक शेअरवर 1000 टक्के लाभांश वितरीत करणार आहे”. लाभांश वाटप घोषणेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना प्रति इक्विटी शेअर 100 रुपये लाभांश वाटप करेल. या लाभांश वाटपासाठी कंपनीने गुरुवार दिनांक 15 डिसेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.

गुंतवणुकीवर मल्टीबॅगर रिटर्न :
नर्मदा जिलेटिन्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 44.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी या कंपनीच्या शेअरची किंमत गेल्या पाच दिवसात 71.23 टक्के मजबूत झाली आहे. या चालू आर्थिक वर्षात नर्मदा जिलेटिन्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये 104.19 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. दरम्यान हा स्टॉक 188.55 रुपये या आपल्या नीचांक किमतीवरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढला आहे. या कंपनीच्या स्टॉकने गेल्या एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 122.87 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money Making Shares of Narmada Gelatins Limited company has announced Dividend to existing share holders on 12 December 2022.

हॅशटॅग्स

Money Making Shares(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x