
Motherson Sumi Share Price | मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सबाबत तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 70.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे.
मात्र तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 84 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के घसरणीसह 70.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
HDFC सिक्युरिटीज फर्मने मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर 77-84 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 67.7 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 70.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1.29 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 15 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यांत मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 13 टक्के मजबूत झाली आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 40 टक्के वाढवले आहे. तर मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 74.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 45.24 रुपये होती. मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 31,473.87 कोटी रुपये आहे.
मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड ही कंपनी मुख्यतः ऑटो ॲन्सिलरीज उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी प्रामुख्याने ऑटोमोटिव्ह पॅरेंट उपकरण उत्पादकांना विविध पार्टसचा पुरवठा, उत्पादन आणि विक्री करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी मदरसन ग्रुपचा भाग म्हणून ओळखली जाते. सध्या या कंपनीकडे विविध 41 देशांमध्ये आणि 230 पेक्षा जास्त उत्पादन केंद्र आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.