
Motisons Jewellers IPO | मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीचा IPO नुकताच गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीचा IPO तब्बल 173 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना शेअर्स वाटप केले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, ते लिंक इन टाइम इंडियाच्या वेबसाईटवर स्टॉक वाटपाचे तपशील चेक करू शकतात.
ग्रे मार्केटमध्ये मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीच्या शेअरने धमाकेदार कामगिरी केली होती. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 155 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते, मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 140 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.
मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 52-55 रुपये निश्चित केली होती. या आयपीओमध्ये कंपनीने आपले शेअर्स 55 रुपये अप्पर प्राइस बँडवर वाटप केले आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 85 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. ज्या गुंतवणूकदारांना IPO शेअर्स मिळाले आहेत, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी अंदाजे 155 टक्के नफा सहज मिळू शकतो.
मोतीसन्स ज्वेलर्स कंपनी आपले शेअर्स मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करणार आहे. मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीचे IPO शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जाणार आहेत.
मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीचा IPO एकूण 173.23 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 135.60 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. त्याच वेळी गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 311.99 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा एकूण 135.01 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.
या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदार किमान 1 लॉट आणि कमाल 13 लॉट खरेदी करू शकत होते. कंपनीने आपल्या IPO च्या एका लॉटमध्ये 250 शेअर्स ठेवले होते. मोतीसन्स ज्वेलर्स या कंपनीची स्थापना ऑक्टोबर 1997 साली झाली होती. ही कंपनी सोने, हिरे आणि कुंदन ज्वेलरी बनवण्याचे आणि विकण्याचा व्यवसाय करते. याशिवाय ही कंपनी मोती, चांदी, प्लॅटिनम आणि इतर धातूंच्या विक्रीचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.