
Mufin Green Share Price | मागील काही काळापासून तेजीत धावणाऱ्या मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअरला आज ब्रेक लागला आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. YTD काळात या कंपनीचे शेअर्स 39 रुपये किंमतीवरून वाढून 135.65 रुपये किमतीवर पोहचले होते. या कालावधीत मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मुफिन ग्रीन फायनान्स या NBFC कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळाली होती. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये लोअर सर्किट लागला होता. आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी मुफिन ग्रीन फायनान्स स्टॉक 4.98 टक्के घसरणीसह 127.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअरने 135.65 रुपये ही उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, या कंपनीचे शेअर्स एनएसई इंडेक्स सूचीबद्ध करण्यात आले आहे.
मुफिन ग्रीन फायनान्स स्टॉक 6 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारातील NSE इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे शेअर्स 6 विविध एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्यात आले आहेत.
NSE इंडेक्सवर मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअरला ‘MUFIN’ असे नाव देण्यात आले आहे. कंपनीने सध्या NSE इंडेक्सवर एकूण 1,50,99,5172 शेअर्स सूचीबद्ध केले आहे. मागील सहा ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत होते.
आज मात्र हा स्टॉक जबरदस्त घसरला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअरची किंमत 220 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.