
Mufin Green Share Price | मुफिन ग्रीन फायनान्स या कोलकात्ता स्थित इलेक्ट्रिक वाहन आणि सौर ऊर्जा व्यवसायाला वित्तपुरवठा करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने मागील 5 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 24 टक्के वाढवले आहेत. अवघ्या पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 112 रुपयेवरून वाढून 140 रुपये किमतीवर पोहचले आहेत.
मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2110 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 108.05 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 146.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 2 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 1178 टक्के वाढली आहे. नुकताच या कंपनीने खाजगी प्लेसमेंटच्या आधारावर नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर जारी करून 17.50 कोटी रुपये भांडवल निधी उभारण्याची योजना मंजूर केली होती. मागील काही दिवसांपासून मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्स धारकांनी गुंतवणूक करून 3563 टक्के नफा कमावला आहे.
एप्रिल 2023 मध्ये या कंपनीने आपले शेअर्स 1 : 2 या प्रमाणात विभाजित केले होते. तर जुलै महिन्यात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर 2023 तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा दुप्पट झाला आहे. या तिमाहीत कंपनीने 4 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
सध्या मुफिन ग्रीन फायनान्स कंपनी विविध मार्गांनी भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनी परिवर्तनीय सिक्युरिटीज, इक्विटी शेअर्स, प्रेफरेंशियल इश्यू, प्रायव्हेट प्लेसमेंट, वॉरंट किंवा डेट सिक्युरिटीज किंवा पात्र संस्थात्मक प्लेसमेंट यासारख्या माध्यमातून भांडवल उभारणीचे पर्याय तपासत आहे. ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिक वाहन आणि सौर ऊर्जा व्यवसायांना वित्तपुरवठा करण्याचे काम करते.
या कंपनीने इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्या लोकांना आतापर्यंत 350 कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. यामुळे 1.73 लाख टन कार्बन उत्सर्जनमध्ये घट झाली आहे. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीने 354 दशलक्ष ग्रीन किलोमीटर अंतर कव्हर करताना 49 कोटी रुपये मूल्याचे ईव्ही वाहने आणि मालमत्ता भाडे तत्वावर दिले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.