
Multibagger Dividend | शेअर बाजारात मागील काही महिन्यांपासून अस्थिरता आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीतही अनेक कंपन्या आहेत ज्यांनी आपल्या भागधारकांना मजबूत लाभांश दिला आहे. त्रिवेणी टर्बाइन अशा कंपणीपैकी एक आहे, जिने आपल्या गुंतवणूकदारांना गोंधळाच्या काळातही लाभांश दिला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी त्रिवेणी टर्बाइन कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांकी किंमत पातळी पासून फक्त 4 टक्के लांब आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार वाढ पाहायला मिळाली होती. NSE निर्देशांकावर या कंपनीचा शेअर 262.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. कंपनीने गेल्या 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 5 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञ आणि गुंतवणुकदार या शेअरबाबत उत्साही दिसून येत आहेत. कंपनीचे बाजार भांडवल 8431.81 कोटी रुपये आहे.
मागील आठवड्यात 4 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्सने BSE निर्देशांकावर 271.90 आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत गाठली होती. या शेअरबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही कंपनी दीर्घकाळात उत्तम परतावा कमावून देते. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत त्रिवेणी टर्बाइन कंपनीच्या शेअर्समध्ये 50.5 टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली होती. 11 ऑक्टोबर 2021 रोजी या कंपनीचा शेअर 168 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर 55 टक्क्यांनी वाढले आहेत. 25 मार्च 2020 ते 10 ऑक्टोबर 2022 या काळात कंपनीच्या शेअर्स ने आपल्या गुंतवणूकदारांना 5 पट अधिक नफा कमावून दिला होता.
लाभांश आणि रेटिंग :
त्रिवेणी टर्बाइन कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वितरीत करण्यातही उत्कृष्ट रेकॉर्ड तयार केला आहे. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 255 टक्के लाभांश वितरीत केला होता, म्हणजेच कंपनीनं प्रति शेअर 2.55 रुपये लाभांश दिला होता. कंपनीच्या मूलभूत गोष्टींकडे पाहता तज्ज्ञ या स्टॉक बाबत उत्साही आणि सकारात्मक दिसून आले आहेत. चिराग अँड रिसर्च असोसिएट, सेंट्रमचे संशोधन विश्लेषक, राहुल कुमार ब्रोकर फर्म यांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, या कंपनीचे शेअर्स पुढील येणाऱ्या काळात 315 रुपये किमती पर्यंत जाऊ शकतात. गुंतवणुक तज्ज्ञ आणि शेअर बाजारातील निरीक्षकांनी या कंपनीला ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.