
Multibagger IPO | या कंपनीचा आयपीओ मे महिन्यात आला होता. लिस्टिंग च्या नंतर शेअर्सच्या किमतीत तब्बल 85 टक्के वाढ झाली आहे. आपण चर्चा करत आहोत पॅरादीप फॉस्फेट्सच्या आयपीओ बद्दल. हा IPO मे महिन्यात आला आणि सुरुवातीला शेअरची किंमत 39 ते 42 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. सध्या या शेअरची किंमत 50 रुपयेच्या वर गेली आहे. आयपीओ मध्ये ज्यांना शेअर्स मिळाले होते ते सर्व गुंतवणूकदार आता जबरदस्त नफ्यात आहेत.
कंपनीबद्दल सविस्तर :
खत उत्पादक कंपनी पॅरादीप फॉस्फेट्सचे उत्पन्न आर्थिक वर्ष 2022-2023 च्या पहिल्या तिमाहीत 85 टक्के वाढले आणि 2,435 कोटी रुपये एवढे झाले आहे. या वर्षी मे महिन्यात पारादीप फॉस्फेट्सचा IPO लॉन्च करण्यात आला होता. IPO ची लिस्टिंग नकारात्मक झाली होती. शेअर्स सुरुवातीला थोडे पडले होते पण नंतर गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा झाला.
तिमाही परिणाम :
पॅरादीप फॉस्फेट कंपनीचे मुख्यालय भुवनेश्वर येथे आहे. कंपनीचा तिमाहीत व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई 56 टक्क्यांनी वाढली आणि 167 कोटी रुपये झाली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीत कंपनीची कमाई 107 कोटी रुपये होती. जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफाही पाच टक्क्यांनी वाढून रु. 63 कोटी रुपये वर गेला आहे. जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 60 कोटी रुपये होता.
उत्पादन स्थिती :
कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जून तिमाहीत कंपनीचे एकूण खत उत्पादन 2,83,624 टन होते. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत उत्पादन 2,27,785 टन झाले. एप्रिल-जून 2022 मध्ये कंपनीचे उत्पन्न 1,316 कोटी रुपये होते.
इश्यूची किंमत किती होती :
पॅरादीप फॉस्फेट चा IPO मे मध्ये आला होता. आणि शेअरची किंमत सुरुवातीला 39-42 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. पण लिस्टिंग होताच शेअर्सच्या किमतीत घासरान पाहायला मिळाली. सध्या शेअरची किंमत 50 रुपयांच्या वर गेली आहे. IPO मध्ये ज्या गुंतवणूकदारांना शेअर्स मिळाले होते ते सर्व गुंतवणूकदार आता प्रति शेअर 8 रुपये नफ्यात आहेत. 2 ऑगस्ट रोजी शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आणि किंमत 54 रुपयांवर गेली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.