14 December 2024 4:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Multibagger Penny Stocks | या २ रुपयाच्या शेअर गुंतवणूकदारांचं आयुष्य सार्थकी लागलं | 1 लाखाचे 2.5 कोटी झाले

Multibagger Penny Stocks

Multibagger Penny Stocks | देशातील पहिला इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले प्लँट उभारणाऱ्या राजेश एक्स्पोर्ट्सने झटपट परतावा दिला आहे. गेल्या काही वर्षांत राजेश एक्सपोर्ट्सच्या शेअर्सनी २५ हजार टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. गेल्या काही वर्षांत राजेश एक्सपोर्ट्सचे शेअर्स २ रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. १३ जून २०२२ रोजी मुंबई शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांहून अधिक वाढून ५४९.२० रुपयांवर पोहोचले.

1 लाखाचे 2.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये झाले :
३ एप्रिल २००३ रोजी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) राजेश एक्सपोर्ट्सचे शेअर्स १.९१ रुपयांच्या पातळीवर होते. १३ जून २०२२ रोजी बीएसईवर कंपनीचे समभाग ५४९.२० रुपयांवर बंद झाले आहेत. राजेश एक्सपोर्ट्सच्या शेअर्सनी या काळात 25 हजार टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने ३ एप्रिल २००३ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये ठेवले असते आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर सध्या पैसे २.८ कोटी रुपये झाले असते.

शेअरची किंमत २५ रुपयांवरून ५५० रुपयांवर :
२३ जानेवारी २००९ रोजी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) राजेश एक्सपोर्ट्सचे शेअर्स २४ रुपयांच्या पातळीवर होते. १३ जून २०२२ रोजी बीएसईवर कंपनीचे समभाग ५४९.२० रुपयांवर बंद झाले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने २३ जानेवारी २००९ रोजी राजेश एक्सपोर्ट्सच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर सध्या हे पैसे २२.८३ लाख रुपये झाले असते. राजेश एक्सपोर्ट्सच्या शेअर्समध्ये 52 आठवड्यांचा उच्चांक 994.50 रुपये आहे. त्याचबरोबर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 516.05 रुपये आहे.

कंपनी उभारणार देशातील पहिला इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले प्लांट :
राजेश एक्सपोर्ट्सची उपकंपनी असलेल्या एलेस्ट या कंपनीतर्फे तेलंगणात देशातील पहिला डिस्प्ले फॅब प्लांट (इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले प्लांट) उभारण्यात येणार आहे. या प्लांटमध्ये कंपनी 24 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. अलिकडेच तेलंगणाचे आयटी मंत्री के. टी. रामाराव यांनी राजेश एक्सपोर्ट्सचे अध्यक्ष राजेश मेहता यांच्यासह जनरेशन 6 एमोलेड डिस्प्ले फॅब बसवण्याची घोषणा केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Penny Stocks of Rajesh Exports Share Price has given 25000 percent return check details 14 June 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x