6 May 2024 5:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Multibagger Stock | 5 रुपये 20 पैशाच्या शेअरची कमाल | गुंतवणूकदारांना 600 टक्क्याहून अधिक परतावा

Multibagger Stock

मुंबई, 26 फेब्रुवारी | देशांतर्गत इक्विटी बाजारासाठी हा एक निराशाजनक आठवडा ठरला कारण रशिया आणि युक्रेनमधील संकटाच्या वाढीदरम्यान बेंचमार्क इक्विटी निर्देशांक 3 टक्क्यांहून अधिक घसरले. 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स 18 फेब्रुवारीला 57,832.97 च्या तुलनेत 25 फेब्रुवारीला 1,974.45 अंकांनी घसरून 55,858.52 वर आला. त्याचप्रमाणे, 50 शेअर्सचा NSE निफ्टी (Multibagger Stock) निर्देशांक याच कालावधीत 617.90 अंकांनी घसरून 16,658 वर आला.

Multibagger Stock of Andhra Cements Ltd stock was trading at Rs 5.20 a year ago. The share price had reached Rs 37.50. The profit in a year as a percentage is more than 600 percent :

तत्पूर्वी म्हणजे गुरुवारी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 105 डॉलरच्या पुढे गेल्याने भारतासारख्या तेल-आयात करणार्‍या देशांमध्ये चलनवाढीची भीती निर्माण झाल्यामुळे भावनाही आणखी घसरली. मात्र, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या जोरदार खरेदीने ही घसरण रोखली.

दरम्यान, शेअर बाजारातील पडझडीच्या आणि अस्थिरतेच्या काळातही असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी मजबूत परतावा देण्याचा कार्यक्रम सुरु ठेवला आहे. बाजारात आज असे अनेक शेअर्स आहेत जे मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकांना मालामाल करत आहेत आणि त्यात अगदी पेनी शेअर्सचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअर बद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना अत्यंत कमी वेळेत मल्टिबॅगर परतावा दिला आहे.

Andhra Cements Share Price :
आंध्रा सिमेंट्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास या शेअरची वर्षभरापूर्वी 5.20 रुपये इतकी किंमत होती. मात्र वर्षभरात या शेअरची किंमत 37.50 रुपयांवर पोहोचली होती. जर गुंतवणूकदारांना एका वर्षात झालेला फायदा टक्केवारीत मोजायचे झाल्यास ती टक्केवारी 600 टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजे या शेअर्समधील गुंतवणूकदारांनी एकावर्षात मोठा नफा कमावला आहे. सध्या या शेअर 14.05 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

आंध्रा सिमेंट्स लिमिटेड कंपनीबद्दल :
आंध्रा सिमेंट्स लिमिटेड कंपनी भारतीय कंपनी कायदा, 1913 अंतर्गत 9 डिसेंबर 1936 रोजी स्थापन करण्यात आली होती. कंपनीचे 100 टन प्रतिदिन क्षमतेचे पहिले युनिट 1940 मध्ये विजयवाडा येथे कार्यान्वित करण्यात आले होते. कंपनीची उत्पादन क्षमता 1951,1958 आणि 1970 मध्ये तीन टप्प्यात वाढविण्यात आली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Multibagger Stock of Andhra Cements Share Price has given more than 600 percent return last 1 year.

हॅशटॅग्स

#MultibaggerStock(386)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x