
Multibagger Stocks | Axel Realty N Infra Limited ही अश्या काही कंपन्यांपैकी एक आहे, जिने आधी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळवून दिला होता आणि आता कंपनीने बोनस शेअर्स देणार असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉकचे विभाजन करण्यासही मान्यता दिली आहे.
Axel Realty N Infra Share Price :
शेअर बाजारातील गुंतवणूकदार आणि तज्ञ नेहमीच बोनस शेअर्सची वाट पाहत असतात. जास्त परतावा देणार्या कंपनीने बोनस शेअर्सचे वाटप केले तर, भागधारकांचा आनंद द्विगुणित होतो. Axel Realty N Infra Limited ही अशा काही कंपन्यांपैकी एक आहे जिने पूर्वी आपल्या भागधारकांना भरघोस परतावा मिळवून दिला आहे आणि आता कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देणार असल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉकचे विभाजन करण्यासही मान्यता दिली आहे. आज आपण या लेखात या स्टॉकची कामगिरी कशी आहे, तसेच बोनस आणि विभाजनाची रेकॉर्ड तारीख कधी आहे, ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
1 शेअर 10 शेअर्समध्ये विभागण्याचा निर्णय :
कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत असे ठरले आहे की कंपनीचा 1 शेअर 10 शेअर्समध्ये विभागण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, Axel Realty N Infra Limited आपल्या गुंतवणूकदारांना 2 शेअर्सवर एक शेअर बोनस म्हणूनही देणार आहे. बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट आता कंपनीने जाहीर केली आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे, की बोनस आणि स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट 28 सप्टेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 64.99 कोटी रुपये असून ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे.
Axel Realty N Infra Ltd कंपनीचा शेअर मागील ट्रेडिंग सेशनमध्ये 4.79 रुपयांवरून 6.95 रुपयांवर जाऊन बंद झाला होता. या कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 101.45 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, जर एखाद्या गुंतवणूकदाराने तीन वर्षांपूर्वी या शेअर मध्ये पैसे गुंतवले असतील आणि त्यांनी आपली गुंतवणूक होल्ड केली असेल, तर त्याला आता तब्बल 396.43 टक्के परतावा मिळाला असेल .या स्टॉकची मागील काही महिन्यातील कामगिरी खराब झाली होती. 2022 वर्षाच्या सुरुवातीला Axel Realty N Infra Limited च्या शेअरच्या किमतीत 27.33 टक्क्यांची जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. या कंपनीची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 13.37 रुपये आहे. या कंपनीची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 2.85 रुपये आहे. कमी पी/बीमुळे, कंपनीची वर्तमान शेअरची किंमत ओव्हरव्हॅल्युड म्हणजेच जेवढी असली पाहिजे त्या पेक्षा जास्त आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.