
Multibagger Stocks | स्मॉल-कॅप कंपनी कमर्शियल सिन बॅग्स लिमिटेड आपल्या शेअर धारकांना 2:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच, ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक एका शेअरवर दोन बोनस शेअर्स मोफत देणार आहे. या कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट 19 नोव्हेंबर 2022 ते 25 नोव्हेंबर 2022 दरम्यान ठरवली आहे. या कंपनीचे शेअर्स 24 नोव्हेंबर 2022 रोजी एक्स-बोनस डेट वर ट्रेड करतील.
कमर्शिअल सिन बॅग्स लिमिटेड ही पॅकेजिंग क्षेत्रात व्यापार करणारी कंपनी असून या कंपनीने मागील पाच वर्षांत आपल्या शेअर धारकांना 715.52 टक्के परतावा कमावून दिला आहे. 17 नोव्हेंबर 2017 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE निर्देशांकावर 44.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते 10 नोव्हेंबर 2022 रोजी हा शेअर 377.10 रुपये किंमतीवर ट्रेड करत होता. म्हणजेच, जर गुंतवणूकदारांनी 5 वर्षांपूर्वी कमर्शियल सिन बॅग्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 8.45 लाख रुपये झाले असते.
कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
कमर्शियल सिन बॅग्स लिमिटेड ही कंपनी पॅकेजिंग क्षेत्रात उद्योग करणारी कंपनी आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 502.20 कोटी रुपये आहे. ही कंपनी FIBC, बिग बॅग्ज आणि फूड ग्रेड FIBC तसेच टारपॉलिन्स, कंडक्टिव्ह बॅग, कंडक्टिव्ह लाइनर्स, बॅफल लाइनर्स, BOPP बॅग्ज, PP फॅब्रिक आणि PP विणलेल्या सॅक बनवण्याचे आणि परदेशात निर्यात करण्याचे काम करते. ही कंपनी आपल्या उत्पादन केंद्रात दरवर्षी 8 दशलक्ष पिशव्या बनवण्याचे काम करते. कंपनी या उद्योग मागील 50 वर्षांपेक्षा जास्त काळापासून व्यवसाय करत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.