
Multibagger Stock| Kabra Extrusion Technik Ltd ही एक S&P BSE मध्ये सूचीबद्ध असलेली स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरने मागील दोन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 04 नोव्हेंबर 2020 रोजी या कंपनीचा स्टॉक 77 रुपयांवर ट्रेड करत होता, जो आता 04 नोव्हेंबर 2022 रोजी 448.90 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरची किंमत 483 टक्के वधारली आहे. दरम्यान, S&P BSE स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 95.5 टक्के वाढ झाली आहे. 04 नोव्हेंबर 2020 रोजी S&P BSE स्मॉल कॅप इंडेक्स 14,883.19 अंकावर ट्रेड करत होता, ज्यात वाढ होऊन S&P BSE स्मॉल कॅप इंडेक्स 04 नोव्हेंबर 2022 रोजी 29,107.24 अंकावर ट्रेड करत होता.
ज्या लोकांनी दोन वर्षांपूर्वी Kabra Extrusion Technik Ltd या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 5.83 लाख रुपये झाले आहे. Kabra Extrusion Technik Ltd ही कंपनी कोलसाइट ग्रुपचा भाग आहे. ही कंपनी प्लॅस्टिक एक्सट्रूजन मशिनरी बनवणारी भारतातील एक आघाडीची कंपनी मानली जाते. Kabra Extrusion Technik Ltd ही कंपनी पाईप्स, प्रोफाइल्स, पेलेट्स, टेलिडक्ट आणि मोनो आणि मल्टीलेअर ब्लोन फिल्म प्लांट्ससाठी हाय-टेक सिंगल आणि ट्विन स्क्रू एक्सट्रूजन लाइन्सची विस्तृत श्रेणी निर्माण करते. ही कंपनी प्लास्टिक उद्योगात चार दशकांहून अधिक काळापासून उद्योग करत आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 च्या Q2 तिमाहीमध्ये एकत्रित आधारावर कंपनीच्या निव्वळ महसूलात 116.65 टक्के वार्षिक वाढ झाली आहे. कंपनीने 180 कोटी रुपये निव्वळ महसूल संकलित केला आहे. कंपनीच्या भांडवली खर्चात जास्त वाढ झाल्यामुळे, बॉटम लाईन तुलनेने कमी दराने वाढली आहे. ही कंपनी सध्या 36.31x च्या इंडस्ट्री PE च्या विरुद्ध 41.62x च्या TTM PE वर ट्रेड करत आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये या कंपनीने अनुक्रमे 9.97 टक्के ROE आणि 13.4 टक्के ROCE वितरित केले आहे. ही कंपनी अ गटातील शेअर्सचा एक घटक असून कंपनीचे मार्केट कॅप 1,454.31 कोटी रुपये आहे.
आज या स्टॉकची ओपनिंग 452.40 रुपयांवर झाली होती. हा स्टॉक ट्रेडिंग सेशनमध्ये 457.05 रुपये या उच्च आणि 446.10 रुपयांच्या नीचांकी किंमत पातळी दरम्यान ट्रेड करत होता. दिवस भराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एकूण 11,982 शेअर्सची खरेदी विक्री झाली होती. दुपारी 2.13 वाजता, Kabra Extrusion Technik Ltd कंपनीचे शेअर्स 457.10 रुपयेवर ट्रेड करत होते, जे BSE वर आदल्या दिवशीच्या 448.90 रुपये किमतीच्या तुलनेत 1.83 टक्के वधारले होते. बीएसई निर्देशांकावर या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 566.40 रुपये आहे. तर या शेअरची नीचांक किंमत पातळी 239 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.