 
						Multibagger Stocks| जगातील सर्वात जलद गतीने अब्जाधीश होणारे व्यक्ती म्हणजे गौतम अदानी. अदानी प्रसिद्ध भारतीय उद्योजक असून, त्यांचे बऱ्याच कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. मागील काही काळात गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. आज या लेखात आपण त्यातीलच एक जाबरदस्त स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत. मागील फक्त एका वर्षात या स्टॉकमध्ये 434.09 टक्के वाढ झाली आहे. एनटीपीसी कंपनीच्या बाजारभावात झालेल्या 6 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत अदानी पॉवरच्या शेअरच्या किमतीत मागील फक्त एका महिन्यात 41 टक्क्यांची वाढ पाहायला आहे.
अदानी ग्रुप स्टॉक :
गौतम अदानी यांची कंपनी अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये शुक्रवारी प्रचंड मोठी उसळी पाहायला मिळाली. NSE वर सकाळी कंपनीचे शेअर्स तब्बल 3.28 टक्के वाढीसह 412.55 रुपयांवर ट्रेड करत होते. शेअरच्या किमतीत झालेल्या जबरदस्त वाढीनंतर अदानी पॉवरने सरकारी मालकीच्या इलेक्ट्रिक युटिलिटी कंपनी एनटीपीसीला बाजार भांडवलच्या बाबतीत मागे टाकले आहे.
16,04,291 कोटी रुपयांचे बाजार भांडवल :
अदानी पॉवर कंपनी आता 160,4291 कोटी रुपयांच्या बाजार भांडवलसह देशात 35 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर NTPC कंपनीचे बाजार भांडवल 154,710 कोटी रुपये असून देशात ती 37 व्या क्रमांकावर आहे. बीएसईच्या डेटा नुसार, अदानी पॉवरने महिंद्रा अँड महिंद्र या ऑटोमोबाईल कंपनीलाही बाजार भांडवलाच्या बाबतीत मागे टाकले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा चे बाजार भांडवल 156,394 कोटी रुपये आहे.
एका वर्षात 308.34.टक्के चा परतावा :
मागील एका महिन्यात, NTPC च्या शेअर च्या किमतीत 6 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत अदानी पॉवरच्या शेअरची किंमत तब्बल.41 टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान, शेअर मार्केट निर्देशांक S&P BSE सेन्सेक्स मध्ये फक्त 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. आतापर्यंत चालू वर्षात 2022 मध्ये, अदानी पॉवरने NTPC च्या तुलनेत आपल्या भागधारकांना तब्बल 308.34 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात स्टॉकमध्ये 434.09 टक्के वाढ झाली आहे. अदानी पॉवरचा जून तिमाहीत करानंतरचा एकत्रित नफा (PAT – PROFIT AFTER TAX) 17 पटीने वाढला असून 4,780 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		