25 April 2024 5:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

Multibagger Stocks | छप्परफाड परतावा, 1 लाख रुपयेचे झाले 28 कोटी, या शेअरमुळे गुंतवणूकदार झाले करोडपती

Multibagger stock s

Multibagger Stocks | शेअर बाजार गुंतवणूक ही नेहमी नवीन लोकांना जोखमीची वाटते. अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेस कंपनी चर्चेत असण्याचे कारण म्हणजे तिने आपल्या गुंतवणूकदारांना दिलेला भरघोस परतावा. अरमान फायनॅन्शियल कंपनीचे बाजार भांडवल 1147 कोटी रुपये आहे. कंपनीचा 52 आठवड्यांची उच्चांक पातळी 1387.75 रुपये एवढी आहे. पण हल्ली ही पेनी स्टॉक मध्ये गुंतवणूक करून जोखीम घेणाऱ्या गुंतवणूकदारांचे शेअर बाजारात प्रमाण बरेच वाढत आहे. बाजारात पडझड आणि अस्थिरता असून देखील अनेक कंपन्यांचे शेअर्स चांगला परतावा देत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला नफा झालेला आहे. मागील आठवड्यातही अशाच एका गैर बँकिंग वित्तीय संस्थेने चांगला परतावा दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती ते आता करोडपती झाले आहेत.

शेअर 48 पैशांवर ट्रेड करत होता :
अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या कंपनीचा एक शेअर 48 पैशांवर ट्रेड करत होता. तर आता त्याची किंमत 48 पैश्यावरून 1300 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मागील काही वर्षांत अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्‍या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 200000% हून अधिक असा भरघोस परतावा दिला आहे. अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेस कंपनीचे बाजार भांडवल 1147 कोटी रुपये आहे. अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या शेअर्सचे 52 आठवड्यांतील उच्चांक मूल्य 1387.75 रुपये आहे, तर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांतील नीचांक मूल्य 603.95 रुपये आहे.

1 लाख रुपये तब्बल 28.14 कोटी रुपये झाले :
11 मार्च 2004 रोजी गैर बँकिंग वित्तीय संस्था असलेली अरमान फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर बाजारात म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 48 पैशांच्या स्तरावर ट्रेड करायला सुरुवात झाली. त्या वेळेपासून सध्या 18 जुलै 2022 पर्यंत हा स्टॉक बीएसईवर 1350.75 रुपयांच्या स्तरावर जाऊन पोहोचला आहे. जर तुम्ही 11 मार्च 2004 रोजी अरमान फायनॅन्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक आजपर्यंत होल्ड करून ठेवली असती, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल 28.14 कोटी रुपये झाले असते.

मागील दहा वर्षाचा परतावा :
मागील10 वर्षांचा परतावा पहिला तर अरमान फायनॅन्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे शेअर्स 20 जुलै 2012 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 25.70 रुपयांवर व्यवहार करत होते. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 52.55 लाख रुपये झाली असती.

मागील 1 महिन्यात 36% पेक्षा जास्त वाढ :
18 जुलै 2022 रोजी कंपनीचा शेअर बीएसई वर 1350.75 रुपयांच्या मूल्यावर बंद झाला आहे. अरमान फायनॅन्शिअलच्या शेअर्सनी गेल्या मागील एक महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मूल्यात 36% पेक्षा जास्त वाढ केली आहे, तर कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत 71% परतावा दिले आहेत. लाँग टर्म दृष्टिकोन असणारे गुंतवणूकदार दीर्घकाळासाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करतात, तर काही लोकं लघु काळासाठी गुंतवणूक करत असतात. जर आपण अरमान फायनॅन्शिअलच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असती आणि ती होल्ड केली असती तर, आज त्याचे मूल्य नक्कीच करोडोमध्ये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Arman financial Share Price return on 23 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x